तरुणीसोबत अश्लील चॅटिंग पडलं महागात

कालांतराने दोघेही अश्लील गोष्टींबाबत बोलू लागले. त्यावेळी तरुणीने तक्रारदाराला त्याचे नग्न फोटो मागितले. तक्रारदाराने फोटो तिला व्हाॅट्स अॅप केले. ते फोटो पाठवल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून तरुणीने खंडणी मागण्यास सुरूवात केली. पैसे न दिल्यास सर्व फोटो सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी तक्रारदाराला देत होती.

तरुणीसोबत अश्लील चॅटिंग पडलं महागात
SHARES

ओळख नसताना सोशल मिडियावर तरुणीसोबत अश्लील चॅटिंग आणि विवस्त्र फोटो शेअर करणे पवईतील तरुणाला चांगलंच महागात पडलं. याच फोटोच्या मदतीने तरुणीने आठ लाखांची खंडणी मागण्यास सुरूवात केली. अखेर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणामागे मित्राचाच हात असल्याचे कळाल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 


तरूणीकडून टाळाटाळ

पवई परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराच्या एका मित्राने काही दिवसांपूर्वी उपनगरात एका हाॅटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी तक्रारदाराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची ओळख अहमद श्यमुअल हक (३२) याच्याशी करून दिली. अहमदने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यावेळी दोघांनी एकमेकांना नंबर दिले होते. काही दिवसांनी तक्रारदाराच्या मोबाइलवर एका अनोळखी नंबरहून मेसेज आला. त्यावेळी त्याने हकने नंबर दिल्याचं सांगितलं. त्यानुसार तक्रारदार समोरील तरुणीशी बोलू लागला. कालांतराने दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्याने तरुणीकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तरुणी वारंवार त्याला टाळायची. 


खंडणी मागण्यास सुरूवात 

कालांतराने दोघेही अश्लील गोष्टींबाबत बोलू लागले. त्यावेळी तरुणीने तक्रारदाराला त्याचे नग्न फोटो मागितले. तक्रारदाराने फोटो तिला व्हाॅट्स अॅप केले. ते फोटो पाठवल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून तरुणीने खंडणी मागण्यास सुरूवात केली. पैसे न दिल्यास सर्व फोटो सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी तक्रारदाराला देत होती. त्यावेळी तक्रारदाराने अहमदला हा सर्व प्रकार सांगून मदतीचे आवाहन केले. अहमदने काही तासांनी पुन्हा तक्रारदाराला फोन करून ती तरुणी ८ लाख रुपये मागत असल्याचे सांगितले. तक्रारदाराने अखेर अहमदला तरुणीला समोरासमोर भेटण्याची अट टाकत पैसे देण्याची तयारी दर्शवली. मात्र अहमद तरुणी समोर येण्यास तयार नसल्याचे कारण पुढे करू लागल्याने अहमदच्या वागण्यावर तक्रारदाराला संशय येऊ लागला. 


दुसऱ्या मोबाइलवरून चॅटिंग

अखेर एका मित्राच्या मदतीने तक्रारदाराने खंडणी विरोधी पथकातील पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली. तक्रारदाराला येणाऱ्या मेसेजच्या टाॅवर लोकेशनजवळ वारंवार अहमदचेच लोकेशन येत असल्याने पोलिसांचा अहमदवरील संशय बळावला. पोलिसांनी अहमदला ताब्यात घेत खाकीचा धाक दाखवल्यानंतर अहमदच या सर्व प्रकरणामागे असल्याचे पुढे आले. अहमदजवळ दोन मोबाइल असून दुसऱ्या मोबाइलवरून तो तक्रारदाराची फसवणूक करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.  



हेही वाचा - 

भाजपाविरोधात व्हिडीओ टाकल्याने तरुणाला अटक; न्यायालयाने पोलिसांना फटकारलं

महिलांचे अश्लील फोटो बनवून पैसे उकळणारा अटकेत



  


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा