भाजपाविरोधात व्हिडीओ टाकल्याने तरुणाला अटक; न्यायालयाने पोलिसांना फटकारलं

व्हिडीओत राकेशने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत भाजप आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यावर टीका केली होती. शहिदांच्या नावाने मत मागणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोंडाला काळे फासायला हवे असे व्हिडीओत म्हटलं होते. हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, १२ एप्रिलला सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने राकेशला ताब्यात घेतले.

भाजपाविरोधात व्हिडीओ टाकल्याने तरुणाला अटक; न्यायालयाने पोलिसांना फटकारलं
SHARES

सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर सांताक्रूझ पोलिसांनी भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात व्हिडीओ बनवल्या प्रकरणी गुन्हा नोंदवत अटक केली. मात्र या कारवाईवर सत्र न्यायालयाने आक्षेप घेत, पोलिसांनी केलेली कारवाई ही हेतूपुरस्सर असल्याचे म्हणतं त्या तरुणाला सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिस्वतंत्र्यावर गदा आणता येणार नाही असे खडे बोलही न्यायालयाने पोलिसांना सुनावले. 


व्हिडीओ युट्युबवर अपलोड

सांताक्रूझ परिसरात शिकवणीचे वर्ग घेणाऱ्या राकेश कनोजिया (३३) याने ११ एप्रिल या दिवशी भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना अनुसरून एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला.  या व्हिडीओत राकेशने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत भाजप आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यावर टीका केली होती.  शहिदांच्या नावाने मत मागणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोंडाला काळे फासायला हवे असे व्हिडीओत म्हटलं होते.

हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, १२ एप्रिलला सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने राकेशला ताब्यात घेतले. राकेशला वांद्रे येथील न्यायालयात हजर केले असता त्याला २६ एप्रिलपर्यंत ताब्यात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. राकेशच्या या व्हिडीओमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. म्हणूनच ही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.


पोलिसांना फटकारले

राकेशच्या या व्हिडीओमुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असे पोलिसांना वाटत असेल तर त्यांनी त्याच्या विरोधात योग्य त्या कलमांखाली एफआयआर का दाखल केली नाही. कायद्याची प्रक्रिया न पाळता पोलिस अधिकारी अशा प्रकारे कुणावरही कारवाई करू शकत नाहीत. पोलिसांची कारवाई हेतूपुरस्सर असल्याचे सांगत न्यायालयाने पोलिसांना फटकारले. हेही वाचा -

महिलांचे अश्लील फोटो बनवून पैसे उकळणारा अटकेत
संबंधित विषय