'नाॅक आऊट' खेळणारे जुगारी झाले 'नाॅक आऊट'

मुंबई पोलिसांच्या झोन ६ मध्ये करण्यात आलेल्या ३ वेगवेगळ्या कारवाई दरम्यान पोलिसांनी १ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

'नाॅक आऊट' खेळणारे जुगारी झाले 'नाॅक आऊट'
SHARES

मुंबईतील जुगाऱ्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या झोन ६ मध्ये करण्यात आलेल्या ३ वेगवेगळ्या कारवाई दरम्यान पोलिसांनी १ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईच्या चुन्नाभट्टी परिसरातील वसंत निवारा इमारतीच्या तळ मजल्यावर 'नाँक आऊट' नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत, शिवाजी नगर परिसरात न्यू लाईन, शिवाजी नगर इथं केलेल्या कारवाईत ६ जणांना ताब्यात घेत ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

तसंच गोवंडीच्या मुक्तीनगर येथील जुगाऱ्यांवर कारवाई करत ६ जणांना अटक केली तसंच ११ मुद्देमाल हस्तगत केला. या सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा-

५ टक्के कमिशनच्या नादात व्यावसायिकाला १० लाखांचा गंडा

'अल कायदा’चं लक्ष्य मुंबईवर, गुप्तचर खात्याचा हाय अलर्ट!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा