५ टक्के कमिशनच्या नादात व्यावसायिकाला १० लाखांचा गंडा

७ जणांच्या टोळीने एका व्यावसायिकाला १० लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

५ टक्के कमिशनच्या नादात व्यावसायिकाला १० लाखांचा गंडा
SHARES

बाजारात २ हजारांच्या नोटांच्या व्यवहारामुळे सुट्टे पैसे मिळणे कठीण झालं आहे. त्यामुळे २ हजाराच्या बदल्यात सुट्टे पैसे दिल्यास ५ टक्के कमिशन देण्याचा व्यवहार तेजीत आहेत. अशाच एका व्यवहाराला घाटकोपरमधील एक इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यावसायिक बळी पडला आहे. ७ जणांच्या टोळीने एका व्यावसायिकाला १० लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.


कसा घातला गंडा?

तक्रारदार यांचा इव्हेंट मॅनेजमेंट आणि फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्या नंबर त्याचे चुलते भरत जैन यांनी टिना वालुंज यांना दिला होता. त्यानुसार टिना यांनी तक्रारदार यांना फोन करून १ कोटी रुपयांच्या बदल्यात २ हजार रुपयांच्या नोटा हव्या असल्याचं सांगितलं. या व्यवहारात तक्रारदार यांना ५ टक्के कमिशन देण्याचं आश्वासनही टिना यांनी दिलं. मात्र त्यावेळी तक्रारदारानी एवढे पैसे उपलब्ध नसल्याचं सांगत व्यवहारास नकार दिला.


एकमेकांना भेटले

त्यानंतर १ जुलै रोजी पुन्हा टिना यांनी फोन करून देवांश भाई नावाच्या व्यावसायिकाला १० लाख रुपये सुट्टे पैसे हवे असल्याचे सांगितलं. त्यानुसार तक्रारदार ५ टक्के कमिशनवर व्यवहार करण्यास तयार झाले. त्यानुसार टिनाने १० लाख रुपये घेऊन तक्रारदारास घाटकोपरच्या ओडियन माॅल इथं बोलावलं. ठरल्याप्रमाणे तक्रारदार, टिना आणि हसमुख परमार हे एकमेकांना भेटले.


१० लाख दिले

त्यानंतर देवांश भाईकडून प्रताप हा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी पुढे आला. त्याच्याकडे पैसे नसल्याने तक्रारदारांना संशय आला. त्यावेळी त्यांनी पैसे दाखवा तरच पुढे व्यवहार करण्याचा आग्रह केला. तसे प्रतापने देवांश या व्यवसायिकाला सांगितल्यानंतर त्याने रिक्षाने येथे एका हाॅटेलमध्ये भेटले. त्यावेळी देवांश भाईने तक्रारदाराला त्याच्याजवळील १० लाख रुपये दिले. त्यानुसार तक्रारदाराने त्याच्याजवळील १० लाख दिले. व्यवहार झाल्यानंतर देवांश तिथून निघून गेले.


गाडीत बसवून नेलं

त्यानंतर तक्रारदारांचा मित्र ईश्वर सिसोदिया आणि प्रताप हे तेथून पैसे मोजून निघत होते. त्यावेळी आग्रहकरून पैशांची बॅग तक्रारदारांकडून प्रतापने स्वतः जवळ घेतली. पैसे घेऊन हे तिघे गाडीजवळ जात असतानाच, पांढऱ्या इनोव्हा कारमधून आलेल्या तिघांनी जणांनी त्यांची वाट अडवली. गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगत त्यांनी प्रतापला जबरदस्ती गाडीत बसवून नेलं.

आपली फसवणूकझाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिस तपासात या गुन्ह्यातील इनोव्हा कार चालक एजाज खान उर्फ देवांश पटेल, आणि नियाज खान यांना पोलिसांनी कुर्ल्यातून अटक केली आहे. याप्रकणातील हसमुख परमार, टिना वालुजा प्रताप आणि दोन अन्य व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

नालासोपाऱ्यात सातव्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

डॉक्टर तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणारा अटकेत



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा