मुंबईत १३ हजार ५५० लीटर अवैध डिझेल जप्त

मुंबईच्या फुटपाथवर डिझेल विकले जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने धाड़ टाकत त्यांच्यावर कारवाई केली.

मुंबईत १३ हजार ५५० लीटर अवैध डिझेल जप्त
SHARES

मुंबई पोलिसांनी धारावी आणि माहिम या ठिकाणी फुटपाथवर एका कंटनेरमध्ये सुरु असलेल्या डिझेल विक्रीचं रॅकेट उद्धवस्त केलं आहे.यावेळी जवळपास १३ हजार ५५० लीटर डिझेल जप्त करण्यात आलं. याप्रकरणी राघवेंद्र ठाकूर नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याचे साथीदार फरार झाले आहेत.

मुंबईच्या फुटपाथवर डिझेल विकले जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने धाड़ टाकत त्यांच्यावर कारवाई केली. राघवेंद्र ठाकूरच्या MS WEST CARE कंपनीला क्लीन अप कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेकडून देण्यात आलं होतं. यासाठी १५० गाड्या लागणार होत्या आणि या गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी चक्क फूटपाथवरच कंटेनर टाकून त्याच्यामध्ये डिझेलची टाकी ठेवण्यात आली.

या १५० गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी माहीम आणि धारावी येथील फूटपाथवर असलेल्या कंटेनरमधील डिझेल भरत होते. यावेळी कारवाई करत मुंबई पोलिसांनी १३ हजार ५५० लीटर डिझेल जप्त केलं.त्याशिवाय एमएस वेस्ट या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या राघवेंद्र ठाकूरला अटक केली. या कंपनीचे डायरेक्टर सध्या फरार आहेत. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहे.

या प्रकरणानंतर पेट्रोल आणि डिझेल अधिकृत पेट्रोल पंपवरुनच खरेदी करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



हेही वाचा -

मंगळवारी व बुधवारी माटुंगा परिसरात पाणीपुरवठा बंद

मुंबईतील 'इतकी' खासगी रुग्णालये धोकादायक



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा