चिन्मयी सुमितसमोर विकृत चाळे करणाऱ्यास अटक


चिन्मयी सुमितसमोर विकृत चाळे करणाऱ्यास अटक
SHARES

अभिनेता सुमित राघवन यांची पत्नी चिन्मयी सुमितसमोरच एका विकृत व्यक्तीने हस्तमैथुन करण्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित विकृताला अटक केली आहे.


सुमित राघवनचं ट्विट

साराभाई व्हर्सेस साराभाई फेम अभिनेता सुमित राघवन यांनी सकाळीच या घडलेल्या प्रकाराबाबत ट्वीट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. त्यांच्या ट्विटवर मुंबई पोलिसांचं कारवाई करण्याचं आश्वासनही आलं होतं. त्यानुसार विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणात गुन्ह्याची नोंद करून घेतली होती.

 

शाळेजवळ घडला प्रकार

सोमवारी सकाळी विलेपार्ले पश्चिममधल्या टिळक शाळेजवळ हा प्रकार घडला. चिन्मयी सुमित या शाळेजवळून जात असताना एक विकृत व्यक्ती अचानक त्यांच्याकडे पाहून हस्तमैथुन करू लागली. हे पाहून धक्का बसलेल्या चिन्मयी राघवन यांनी वेळीच सावरून संबंधित व्यक्तीला मारण्यासाठी त्याच्या दिशेने धाव घेतली. त्याच्या कानशिलातही लगावली. मात्र, पुढे काही कळण्याअगोदरच सदर व्यक्तीने पळ काढला होता.

 

जीवन चौधरी नामक व्यक्तीला अटक

हा प्रकार घडल्यानंतर सुमित राघवन यांनी ट्विटरवर सदर प्रकार ट्विट केला. यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली. संध्याकाळी ४२ वर्षीय जीवन चौधरी या व्यक्तीला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. जीवन विलेपार्ले परिसरातच एका सोसायटीमध्ये रहात असून तिथेच कामही करतो.


सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय मिळणार?

याप्रकरणी विलेपार्ल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्मयी सुमित यांचा गैरसमज झाला असून मी पँटची चेन लावत होतो अशी माहिती आरोपीने चौकशीमध्ये दिली आहे. मात्र, अद्याप सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली नसल्यामुळे अंतिम सत्य त्यातूनच पुढे येऊ शकेल.



हेही वाचा

सुमित राघवनच्या पत्नीसमोर अनाहुताचे विकृत चाळे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा