प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटाच्या गाडीचा नंबर वापरणाऱ्याला अटक


प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटाच्या गाडीचा नंबर वापरणाऱ्याला अटक
SHARES

अंकशास्त्रामुळे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या वाहन क्रमांकांचा वापर करून नियम तोडणा-या वाहन चालकाला पकडण्यात वाहतुक पोलिसांना यश आले. आरोपी वाहतुकीचे नियम तोडत असल्यामुळे टाटा यांच्या नावावर ई चलन जात होते. ते सर्व ई चलन आरोपीच्या नावावर वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः- ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जलवाहिन्यांची तातडीची दुरुस्ती

एक चालकाने रतन टाटा यांच्या वाहन क्रमांकाची पाटी स्वतःच्या बीएमडब्ल्यू कारवर लावली असल्याची माहिती वाहतुक पोलिसांना मिळाली होती. त्यानसार शोध घेतला असता ते वाहन मे. नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा. लि. यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसर वापर चालकाविरोधात याप्रकरणा माटुंगा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत अंकशास्त्रामुळे त्याने कारमधील एक क्रमांक गहाळ करून व्हीआयपी क्रमांक तपास केला व त्याची पाटी लावत होता. पण त्या क्रमांकाची कार टाटा यांच्या मालकीची असल्यामुळे त्यांच्या नावाने ईचालान तयार होत होते. 

त्यानुसार मालक कंपनीच्या संचालिकाविरोधात गुन्हा दाखल करण्या आला असून टाटा यांना गेलेले सर्व ई चलन आरोपीच्या नावावर वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणी सहपोलिस आयुक्त यशस्व यादव यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप फणसे, पोलिस हवालदार अजीज शेख यांना उकृष्ट कामगिरीबद्दल पाच हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा