तस्करीच्या संशयावरून समुद्रात १० जणांना अटक

गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मासेमारी बोटीच्या संशयास्पद हालचाली कोस्ट गार्डला दिसून आल्या. या बोटीने मुंबई किनाऱ्यापासून २० नाॅटिकल मैलावर दुसऱ्या एका बोटीला अडवले.

तस्करीच्या संशयावरून समुद्रात १० जणांना अटक
SHARES

मुंबई पोलिसांनी नुकतंच समुद्रात दोन मासेमारी नौका अडवून त्यामधील १० जणांनी अटक केली. त्यांच्याकडून परदेशी ब्रँडची सिगारेट, दारूच्या बाटल्या आणि अमेरिकन डॉलर्स हस्तगत केले आहेत. या मुद्देमालाची किंमत १३ लाख रुपये आहे. 

गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मासेमारी बोटीच्या संशयास्पद हालचाली कोस्ट गार्डला दिसून आल्या. या बोटीने मुंबई किनाऱ्यापासून २० नाॅटिकल मैलावर दुसऱ्या एका बोटीला अडवले. त्यामुळे कोस्ट गार्डला ही बोटी संशयास्पद वाटली. त्यानंतर कोस्ट गार्डने दोन्ही बोटींना अडवले आणि त्यावरील १० लोकांना ताब्यात घेतले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांकडे मासेमारीसाठी परवाना नव्हता. त्यामुळे कोस्ट गार्डने त्यांना ताब्यात घेऊन यलो गेट स्थानकात पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याकडे सापडलेले परदेशी चलन आणि दारूबाबत आरोपी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. तस्करीच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायद्यान्वये (सीओटीपीए) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 



हेही वाचा -

अमेरिकेहून आलेल्या सूनेची सासूने केली झोपेतच हत्या

विरारमध्ये मोबाइल शॉपमधील गोळीबारात २ जण जखमी




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा