अमेरिकेहून आलेल्या सूनेची सासूने केली झोपेतच हत्या

१ डिसेंबरला रोहन पत्नी आणि मुलीसोबत अमेरिकेहून वसईला आई-वडिलांकडे आला होता. रोहनच्या लग्नापासूनच रिया आनंदी मानेला आवडत नव्हती.

अमेरिकेहून आलेल्या सूनेची सासूने केली झोपेतच हत्या
SHARES

वसईत सूनेची सासूनेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सून झोपेत असताना सासूने तिच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वार केले. हत्येनंतर सासूने स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबुली दिली.  रिया माने (३२) असं हत्या झालेल्या सूनेचं नाव आहे. माणिकपूर पोलिसांनी आनंदी माने (४८) या सासूला अटक केली आहे. 

सासूला सून आवडत नसल्याने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.  रियाचा पती रोहन माने हा अमेरिकेत इंजिनिअर आहे. तर रिया ही नर्स होती. या दोघांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना सहा महिन्यांची मुलगीही आहे. १ डिसेंबरला रोहन पत्नी आणि मुलीसोबत वसईला आई-वडिलांकडे आला होता. रोहनच्या लग्नापासूनच रिया आनंदी मानेला आवडत नव्हती. दोन दिवसांपूर्वी रोहनची मुलगी घेण्यावरुन सासू-सुनेत किरकोळ वाद झाला होता.

रविवारी सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान रोहन, त्याचे वडील आणि सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन फिरायला गेले होते. वसई पश्चिममधील ओमनगरमधील इस्कॉन हाईट्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घरात रिया आपल्या घरात बेडरुममध्ये झोपली असताना सासू आनंदीने तिच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने वार केले. यामध्ये रियाचा जागेवरच मृत्यू झाला.  हत्येनंतर सासूने स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. पण हत्येनंतर आपणही आत्महत्या करण्यासाठी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचे पोलिसांना सांगितले.हेही वाचा -

विरारमध्ये मोबाइल शॉपमधील गोळीबारात २ जण जखमी

काळाचौकीतील २ मुलांचा लोणावळ्यातील पवना डॅममध्ये बुडून मृत्यू
संबंधित विषय