अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गंडवणाऱ्या टोळीचा मुंबईत पर्दाफाश

फोनवर फ्लुएन्ट इंग्रजी बोलत असल्यामुळे नागरिकही या भामट्यांच्या फसवणूकीला बळी पडत होते.

अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गंडवणाऱ्या टोळीचा मुंबईत पर्दाफाश
SHARES

अमेरिकेत सध्या निवडणूकीचे वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत नागरिक सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात अँक्टीव झालेले आहेत. अमेरिकन नागरिकांच्या याच संधीचा फायदा घेत त्यांना गंडवणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फेक इंटरनॅशनल कॉल सेंटर उघडून हे भामटे लोकांना फसवत होते.

हेही वाचाः- मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

मुंबईत बसून अमेरिकेतील नागरिकांना आम्ही FBI मधून बोलतोय तुमच्या गाडीत ड्रग्स सापडलेत, तुमची गाडी जप्त केलीये, तुमच्या गाडीचे कागदपत्रे बनावट आहेत अशी विविध कारणे सांगून अमेरिकन नागरिकांना घाबरवत आणि नंतर मग सेटलमेंटच्या नावाखाली त्यांच्याकडून ही टोळी पैसे उकळत होती. फोनवर फ्लुएन्ट इंग्रजी बोलत असल्यामुळे नागरिकही या भामट्यांच्या फसवणूकीला बळी पडत होते. याची कुण कुण कांदिवली पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी या भामट्याचा माग काढला. त्यावेळी गोराई परिसरातून ही टोळी हे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी गोराईमधून या टोळीला अटक केली असून चार जणांची ही टोळी आहे. उमेश पारेख, आदील हुसेन आडवाणी, जिनेल पटेल आणि इरफान शेख अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचाः-शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश!

कांदिवली पोलिसांनी चार कॉम्पयुटर, एक लॅपटॉप, मोबाईल फोन आणि बनावट कॉल सेंटरशी संबंधित अनेक उपकरणे जप्त केली आहेत. अमेरिकेतली शहरं, तिथल्या वेळा, लोकांच्या कामाची पद्धत, बँकांची माहिती अशा सगळ्या गोष्टींचा या युवकांनी अभ्यास केला होता. हे सगळे उच्चशिक्षित असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे ऑनलाईन व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे ही फसवणूक जास्त प्रमाणात होत आहे. नागरिकांनी व्यवहार करतांना काळजी घ्यावी. भुलथापांना बळी पडू नये असं वारंवार सांगितलं गेलं. ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याची माहिती करून घेतली पाहिजे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा