Corona virus: पोलिसांना चहा, नाश्ता, जेवण 'यूज अॅन्ड थ्रो' साहित्यातून

संशोधनानुसार कोरोनाला प्लास्टिक, स्टिलच्या वस्तूचं आवरण अनुकूल असतं, प्लास्टिक आणि स्टिलच्या पृष्ठभागावर तो तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो

Corona virus: पोलिसांना चहा, नाश्ता, जेवण 'यूज अॅन्ड थ्रो' साहित्यातून
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने देशभरात संचारबंदी अर्थात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या महामारीशी लढण्यासाठी एकीकडे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य व पालिका विभागाचे अधिकारी आणि पोलिस आपल्या जीवाचे रान करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन तर केले आहे. मात्र त्याचा संसर्ग रोखण्यासाठी काही उपाययोजना ही करणे गरजेचे आहे. संशोधनानुसार कोरोनाला प्लास्टिक, स्टिलच्या वस्तूचं आवरण अनुकूल असतं, प्लास्टिक आणि स्टिलच्या पृष्ठभागावर तो तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. म्हणूनच पोलिस कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यांना आता स्टिल थाळीतून जेवण देण्याऐवजी पत्रावळ्यातून जेवण दिले जात आहे.  

हेही वाचाः- लाॅकडाऊन असताना ही घराबाहेर पडल्याचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

महाराष्ट्रात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही १२४वर जाऊन पोहचली आहे. दिवसागणित हा आकडा वाढतच आहे. या बाधित रुग्णांच्या सर्वात जवळ डाॅक्टर, नर्स, आरोग्य अधिकारी आणि पोलिस हे असतात. रुग्णांच्या संपर्कातून या रोगचा प्राधुर्भाव इतरांना ही झाल्याच्या घटना ताज्या आहेत. हा व्हायरस झपाट्याने पसरतो, संशोधनातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती अशी की, हा व्हायरस प्लॅास्टिक रॅप, स्टिल आणि कागदी पुठ्यांवर तासंन तास राहतो. त्यामुळे अशा वस्तूंना हात लावल्यास त्यांना ही इन्फेक्शन होऊ शकते.  त्यामुळे तुम्ही आॅर्डर केलेली वस्तू एखाद्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आली. त्याच्या संपर्कातून तो व्हायरस त्याच्या घरी अथवा तो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी पसण्याची भिती आहे. 

 हेही वाचाः- राणेंनी मागितली संजय राऊतांची माफी?

 त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबई पोलिसांच्या आयुक्तालयातील उपारगृह व आझाद मैदान पोलिस क्लब येथील उपहारगृह येथे चहा, नाश्ता, जेवणा करता, युज अॅन्ड थ्रोच्या प्लेट्स, चहाचे ग्लास व चमचे वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   

 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा