सराईत गुन्हेगारांसाठी मुंबई पोलिसांनी सुरू केले ‘ऑपरेशन ऑलआऊट’

या कारवाईत ३६२ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच २२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत ५३ प्रकरणं दाखल करण्यत आली आहे.

सराईत गुन्हेगारांसाठी मुंबई पोलिसांनी सुरू केले ‘ऑपरेशन ऑलआऊट’
SHARES

मुंबई लाँकडाऊन दरम्यान सराईत गुन्ह्यांना जरी ब्रेक लागला असला. तरी काहीभागांमध्ये सराईत गुन्हेगारांची दहशतही आजही दिसून येते. या सराईत गुन्हेगारांची दहशत मोडून शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी आता ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरू केले आहे. त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते या कारवाईत ३६२ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच २२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत ५३ प्रकरणं दाखल करण्यत आली आहे.

हेही वाचाः- माहीम परिसरात फुटली जलवाहिनी; 'या' परिसरात पाणीपुरवठा नाही

गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात सक्रिय मोहिम राबविण्यासाठी मुंबई पोलीसांनी ४ डिसेंबरच्या मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन केले. सह पोलीस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था ) विश्वास नांगरे पाटील व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. सर्व  ५ प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व १३ परिमंडळ विभागांचे पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले.

हेही वाचाः- येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार- उद्धव ठाकरे

प्रत्येक पोलीस ठाण्यांमधुन जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक टिमसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी , संशयास्पद व्यक्ती व क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखानांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, ड्रग्स, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, शोधण्यासाठी नाकाबंदीचे व कोम्बिंग ऑपेरशन चे आयोजन, फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे,प्रलंबित अजामीनपात्र वारंट आणि स्थायी वारंटची बजावणी,अवैध दारू, जुगार ई. अशा बेकायदेशीर क्रियांवर कारवाई, पोलीस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.

 

ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत कारवाई

- गंभीर गुन्हयातील अभिलेखावरील ३६२ गुन्हेगार तपासणी.

- २२ बाहय गुन्हेगार आढळून आले आणि त्यांना अटक केली.

ड्रग्स-एन.डी.पी.एस कायदयाअंतर्गत ५३ प्रकरणे, ज्यात ४ प्रकरणे ड्रग्स सेवन संदर्भात

आहेत. ड्रग्स जसे एम.डी.एम.ए, गांजा, जप्त केले.

- ८५१ हॉटेल्स, लॉज, मुसाफिरखाना तपासले.

- ८६१ ठिकाणी नाकाबंदी दरम्यान सात हजार 562  वाहनांची तपासणी केली.

-१८९  ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.

- एक अवैध अग्नीशस्त्र, ११ धारदार शस्त्रे (सुरी, तलवार इ.) जप्त केले.

-४८ फरार आणि पाहिजे आरोपीतांना अटक करण्यात आली.

- १६७ अजामीनपात्र वारंट ची बजावणी केली.

-अवैध कृती विरोधात ९५ छापे, अटक आणि जप्ती करण्यात आली.

- ४२८ महत्वाच्या ठिकाणी पायी गस्त आयोजीत करण्यात आली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा