दाऊदचा पुतण्या सोहेल कासकरचं महिन्याभरात प्रत्यार्पण

मली पदार्थांच्या तस्करीत सोहेल याला स्पेनमध्ये अटक करण्यात आली होती. कोलंबियातील दहशतवादी पथकाला तो ड्रग्ज पुरवायचा. त्याचं भारतात प्रत्यार्पण झाल्यास दाऊद टोळीची भारतातील अंमली पदार्थांच्या तस्करीची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळू शकते.

दाऊदचा पुतण्या सोहेल कासकरचं महिन्याभरात प्रत्यार्पण
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा पुतण्या सोहेल कासकरचं महिन्याभरात प्रत्यार्पण होण्याची होण्याची शक्यता आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीत सोहेल याला स्पेनमध्ये अटक करण्यात आली होती. कोलंबियातील दहशतवादी पथकाला तो ड्रग्ज पुरवायचा. त्याचं भारतात प्रत्यार्पण झाल्यास दाऊद टोळीची भारतातील अंमली पदार्थांच्या तस्करीची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळू शकते.


कोण आहे सोहेल?

सोहेल हा दाऊदचा भाऊ नूरा कासकर याचा मुलगा आहे. २०१४ मध्ये सोहेलला नार्को टेरिरिझम प्रकरणी अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला अमेरिकेहून प्रत्यार्पण करून स्पेनच्या ताब्यात देण्यात आलं होतं. तेव्हापासून भारतीय तपास यंत्रणा त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसऱ्या बाजूला सोहलचं दुबईत प्रत्यार्पण व्हावं यासाठी पाकिस्तानकडून जोर लावण्यात येत आहे.


बनावट पासपोर्ट

सोहेलकडे पाकिस्तानचा बनावट पासपोर्ट देखील आढळून आला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. तर त्याच्या जुन्या पासपोर्टची प्रत भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्या प्रत्यार्पणाच्या कागदपत्रात जोडली आहे. त्यामुळे त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या आशा वाढल्या आहेत. सोहेलने २०१३ मध्ये दुबईतून पासपोर्टचं नूतनीकरण केलं होतं.


दाऊद टोळीला धक्का

सोहेलचा ताबा मिळाल्यास दाऊदच्या टोळीच्या सर्व गैरकृत्यांची माहिती भारताला मिळू शकते. त्याकडे पाहता सोहेलचं भारतात प्रत्यार्पण झाल्यास, तो दाऊद टोळीसाठी मोठा धक्का असू शकतो. सोहेलला भारतात आणण्याचं काम अंतिम टप्यात असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

दाऊदला लागोपाठ दोन झटके, भारताला मिळणार पुतण्याचा ताबा

डी कंपनी पुन्हा हादरली, छोटा शकीलचा भाऊ अन्वरला अबूधाबीत अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा