अभिनेता गुरूप्रित सिंहचा मोबाइल पोलिसांनी शोधून काढला

फेब्रुवारी महिन्यात गुरूप्रित हा त्याच्या मित्राच्या घरी होळी उत्सवासाठी गेला होता. त्यावेळी गोंधळात कुणीतरी गुरूप्रितचा मोबाइल चोरला

SHARE

मुंबईच्या जुहू परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध सिरियलमधील अभिनेता गुरप्रित सिंगचा मोबाइल होळीच्या उत्सवादरम्यान चोरीला गेला होता. याबाबत गुरूप्रितनं जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नांनी गुरूप्रितचा मोबाइल शोधून काढत एका व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं आहे.


महत्वाची कागदपत्रे 

‘कही तो होगा, सारथी, महाभारत, रंगरसीया, या सारख्या हिंदी सिरियलमधून गुरूप्रित हा नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे. फेब्रुवारी महिन्यात गुरूप्रित हा त्याच्या मित्राच्या घरी होळी उत्सवासाठी गेला होता. त्यावेळी सर्व गोंधळात कुणीतरी गुरूप्रितचा मोबाइल चोरला. या मोबाइलमध्ये गुरूप्रितचे अनेक महत्वाची कागदपत्रे आणि त्याचे पर्सनल फोटो होते. कित्येक तास शोधूनही मोबाइल मिळत नसल्यामुळं गुरूप्रितनं जुहू पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.


उत्तर प्रदेशचं लोकेशन

त्यानुसार, पोलिसांनी गुरूप्रितचा मोबाइल ट्रेसिंगला टाकला. त्यावेळी त्याचं लोकेशन उत्तरप्रदेशचं दाखवलं जात होतं. पोलिसांनी त्या लोकेशननुसार एकाला ताब्यात घेत त्याच्याजवळून गुरूप्रितचा मोबाइल ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी गुरूप्रितचा मोबाइल बुधवारी त्याच्याकडं सुपूर्द केला असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

वडाळा पोलिसांची मृत्यूच्या छायेतील दहावर्ष संपली

'डेक्कन क्वीन'चा प्रवास होणार आणखी लवकरसंबंधित विषय
ताज्या बातम्या