मुंबईच्या समुद्रात कोट्यवधींची तेल तस्करी, तेल माफिया राजू पंडितसह दोघांना अटक

समुद्रातून तेलाची तस्करी करणाऱ्या एका बड्या माफियाचा पोर्ट झोन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी माफिया राजू पंडित (५०) सह पोलिसांनी सोनू उर्फ जमील मोहम्मद हुसेन कुरेशी (२१), मोहम्मद अन्सारी या दोघांना अटक केली आहे.

मुंबईच्या समुद्रात कोट्यवधींची तेल तस्करी, तेल माफिया राजू पंडितसह दोघांना अटक
SHARES

देशात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतींनी उच्चांक गाठल्याने समुद्रात तेलाची तस्करी करणाऱ्या बड्या माफियांनी पुन्हा तोंडवर काढण्यास सुरूवात केली आहे. समुद्रातून तेलाची तस्करी करणाऱ्या एका बड्या माफियाचा पोर्ट झोन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी माफिया राजू पंडित (५०) सह पोलिसांनी सोनू उर्फ जमील मोहम्मद हुसेन कुरेशी (२१), मोहम्मद अन्सारी या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.


मुंबईबाहेर तेल तस्करी

मुंबई पोलिसांनी समुद्रात पेट्रोल आणि डिझेलची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरू केल्यानंतर सराईत टोळ्यांनी मुंबईबाहेर तेल तस्करी सुरू करण्यास सुरूवात केली. सप्टेंबर महिन्यान पोलिस गणपतीच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने मुंबईच्या समुद्रात एक मोठं जहाज तेल तस्करी करण्यास येणार होतं. देशात तेलाच्या वाढत्या किंमतींचा फायदा घेऊन तेल तस्करांनी पोलिसांची नजर चुकवून ही तेल तस्करी करण्याचं ठरवलं होतं.


७० लिटर डिझेलची चोरी

त्यानुसार गौरी-गणपती विसर्जनावेळेस पोलिस बंदोबस्तात व्यस्त असल्याने ही टोळी समुद्रातून शेकडो लिटर तेल चोरी करत होती. गस्तीवर असलेल्या यलोगेट पोलिसांना लकडाबंदर जवळील समुद्रात सोमवार १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.४५ वाजता एक संशयित बोट आढळून आली. या बोटीवर कुणी नसल्याने पोलिसांनी झडती घेतली असता त्यांना त्यात ७० लिटर डिझेल आढळून आलं.




राजू पंडितचा हात

अधिक चौकशीत पोलिसांनी या बोटीवर काम करणारे सोनू उर्फ जलील कुरेशी, मोहम्मद अन्सारीसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. या तिघांकडे केलेल्या चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. मात्र या गुन्ह्यातील मास्टर माईंडची माहिती देण्यासाठी ते तोंड उघडत नव्हते. सोनूचा मोबाइल तपासल्यावर त्यातही संशयास्पद आढळून आलं नाही. मात्र मोबाइलमध्ये सोनूच्या नकळत काही फोनची रेकाॅर्डिंग झाली होती. त्या रेकाँर्डिंगमध्ये सोनूला कुख्यात तेल माफियी राजू पंडित या तस्करीबाबत मार्गदर्शन करत असल्याचं उघडकीस आलं. पोलिसांना चौकशीत या कटामागे राजू पंडितचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.


तस्करांचे धाबे दणाणले

राजू पंडितच्या अटकेनंतर सर्व तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकणातील एक सराईत आरोपी फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ७० लिटर तेलासह एक बार्च हस्तगत केली आहे. समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या बोटींना ही टोळी बाजारभावापेक्षा कमी किंमतीत म्हणजेच ५५ रुपये लिटरने डिझेल आणि पेट्रोल ६५ रुपये लिटर या भावाने विकत होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करत जीवनाश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्ही नोंदवून अटक केली आहे. तर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.


समुद्रात कोट्यवधींची तेल तस्करी

मुंबईच्या समुद्रात बाहेरून येणाऱ्या जहाजांच्या कॅप्टनला गाठून ही तस्करी केली जायची. शेकडो लिटर तेल विकत घेऊन ते ५५ रुपये लिटर मागे विकून ही टोळी दिवसाला लाखो रुपये कमवायची. महिन्याची त्यांची कमाई कोट्यावधी रुपयांची आहे. या तस्करांचा मास्टरमाईंड राजू पंडित असल्याचे पुढं आलं आहे. राजूवर या पूर्वीही तेल तस्करीचे ५ गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मात्र या गुन्ह्यात पहिल्यांदाच त्याला पोलिसांकडून अटक झाल्याने इतर तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


तेल तस्करीप्रकरणी यलोगेट पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा सहाय्यक पोलिस आयुक्त पदाचे अधिकारी करत आहे.
- रश्मी करंदीकर, पोलिस उपायुक्त ( पोर्ट झोन)



हेही वाचा-

घ्या ऐका, चोर म्हणे '५० व्या चोरीचा मला अभिमान'!

सराईत दुचाकी चोराला अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा