चोरीच्या आरोपावरून खांबाला बांधून तरुणाची हत्या, सांताक्रूझमधील धक्कादायक प्रकार


चोरीच्या आरोपावरून खांबाला बांधून तरुणाची हत्या, सांताक्रूझमधील धक्कादायक प्रकार
SHARES

सांताक्रूझमध्ये चोरीच्या आरोपावरून एका तरुणाला बांधून बेदम मारहाण करून ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. सांताक्रूझ पश्चिमेकडील मुक्तानंद पार्कमध्ये ही घटना घडली. पालिकेचं हे मैदान म्हणजे गर्दुल्ल्यांचा अड्डा आहे. इथं आलेल्या सैजाद खान (३०) नावाच्या तरुणाला तिथला मुकादम आणि कामगारांनी लोखंडी खांबाला बांधलं. त्यानंतर काठी आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

हेही वाचाः- अ‍ॅमेझॉनला धडा शिकवला; 'त्या' मनसे नेत्याकडून कार्यकर्त्यांचं अभिनंदन

मुक्तानंद पार्कमध्ये ही घटना घडली असून लोखंडी खांबाला बांधून काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. बेदम मारहाणीत सैजाद खान याचा मृत्यू झाला. सांताक्रूझ पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केलीय. सैजादच्या खूनप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलीय. पालिकेचं मुक्तानंद पार्क आहे नशेचा अड्डा बनलंय. यासंदर्भात स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रार देखील करण्यात येते. आतापर्यंत अनेकांना मुकादमच्या सांगण्यावरून कामगारांनी बेदम मारहाण करण्यात आलीय. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी भा.द.वि कलम ३०२, ३४२, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवून  ६ आरोपींना अटक केलीय. बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याने सांताक्रूझ परिसरात खळबळ पसरलीय.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा