राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला पोलिस

रेल्वे पोलिस दलात ३ हजारहून अधिक पोलिस कार्यरत आहेत.त्यापैकी पोलिस शिपायांच्या पगारातून ५०० रुपये तर पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या वरील अधिकाऱ्यांकडून १००० रुपये पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून काढण्यात आलेले आहे.

राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला पोलिस
SHARES

गेल्या महिन्याभरात राज्यातील विविध भागात अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण या भागांना बसला. या ठिकाणी आलेल्या पूरात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. होतं नव्हतं ते सर्व काही गमावलं. अशा परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना सर्वच स्तरातून मदत दिली जात आहे. सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे पोलिसही आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मुंबईच्या रेल्वे पोलिसांनी त्यांच्या एक दिवसांचा पगार पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.  मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे.


घरे पाण्याखाली 

महाराष्ट्रातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, कोकण, नाशिक या जिल्ह्यांतील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. कोल्हापूर आणि सांगलीतील असंख्य घरे अनेक दिवस पाण्याखाली होती. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या स्थितीत पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी सर्वच स्तरातून मदत करण्यात येत आहे. मराठी कलाकारांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन नागरिकांना मदत करण्यास सुरूवात केली आहे. मग नागरिकांच्या तत्परेसाठी  सदैव पुढे असलेले पोलिस कसे मागे राहतील.


१६ लाख रुपये मदत

मुंबईच्या रेल्वे पोलिसांनी या पूरग्रस्तांची संसाराची विस्कटलेली घडी पून्हा बसवण्यासाठी आपला एक दिवसांचा पगार  देण्याचे ठरवले आहे. रेल्वे पोलिस दलात ३ हजारहून अधिक पोलिस कार्यरत आहेत. त्यापैकी पोलिस शिपायांच्या पगारातून ५०० रुपये तर पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या वरील अधिकाऱ्यांकडून १००० रुपये पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून काढण्यात आले आहेत. साधारण १६ लाख रुपये अंदाजे रेल्वे पोलिसांकडून जमवण्यात येणार आहेत. तर पाठोपाठ मुंबई पोलिसही अशा प्रकारे पूरग्रस्तांना मदत करणार असल्याची माहिती मिळत आहे. या शिवाय अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना शालेय वस्तू, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन, औषध आदी साहित्य कुठलाही देखावा न करता पाठवलेल्या आहेत. त्यामुळे दरवेळीप्रमाणे संकटप्रसंगी खाकी ही सर्व सामान्यांच्या मदतीसाठी धावून आली आहे.हेही वाचा -

बीसीसीआयला धमकीचा मेल पाठवणारा अटकेत

गटारावरची लोखंडी झाकणं चोरणारे अटकेत
संबंधित विषय