गटारावरची लोखंडी झाकणं चोरणारे अटकेत

टँक्सी च्या शेजारी दोन जण खाली वाकून संशयास्पद हालचाली करत होते. त्याच वेळी पोलिसांनी त्यांना झाकण चोरताना रंगेहाथ अटक केली. त्याच्या टँक्सीत अन्य तीन झाकणे पोलिसांना मिळून आली.

गटारावरची लोखंडी झाकणं चोरणारे अटकेत
SHARES
मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात टॅक्सीच्या मदतीने गटारावरची लोखंडी झाकणं चोरी करणाऱ्या दोघा जणांना जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल मोहम्मद सिद्धिकी खान, धीरज सिंह अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून ४ झाकणं पोलिसांनी हस्तगत केली आहेत. 


शेकडो सीसीटीव्ही पडताळले

अंधेरी, ओशिवरा, अंबोली आणि जोगेशेवरी परिसरात जुलै महिन्यांपासून गटारावरची लोखंडी झाकणं चोरीला जात होती. याबाबत पालिकेकडून झाकणं चोरीला गेलेल्या स्थानिक पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन झाकणं चोरी करणाऱ्या आरोपींचा माग काढण्यास पोलिसांनी सुरूवात केली. त्यासाठी शेकडो सीसीटीव्ही पडताळले. मात्र आरोपींबाबत काही ठोस पुरावे हाती लागत नव्हते. सध्या पावसाळा सुरू असून ज्या भागातील गटाराची झाकणं चोरीला गेली होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरते. त्यामुळे जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


पोलिस कोठडी

जोगेश्वरी येथील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक टॅक्सी संशयीतरित्या फिरताना पोलिसांना आढळली. १८ आॅगस्ट दरम्यान हीच टॅक्सी पुन्हा जेईएस स्कूल जवळ दिसून आली. टॅक्सीच्या शेजारी दोन जण खाली वाकून संशयास्पद हालचाली करत होते. त्याच वेळी पोलिसांनी त्यांना झाकण चोरताना रंगेहाथ अटक केली.  टॅक्सीत अन्य तीन झाकणं पोलिसांना सापडली.  तर काही झाकणं त्यांनी जोगेश्वरीच्या पूर्वेला वन मंदिराजवळील झुडपात लपवून ठेवल्याची कबुली दिली. मागील ५ ते ६ महिन्यांपासून हे दोघे झाकणांची चोरी करत होते.  या प्रकरणी जोगेशेवरी पोलिस अधिक तपास करत असून न्यायालयाने दोघांना २४ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.हेही वाचा -
संबंधित विषय