तलावात बूडुन १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

  Palghar
  तलावात बूडुन १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
  मुंबई  -  

  उन्हाळी सुट्टी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात गेलेल्या मनन कोकिन गोगरी या 13 वर्षीय मुलाचा विक्रमगड येथे तलावात बुडून मृत्यू झाला. मनन हा विक्रोळीच्या टागोरनगर येथील निलकमल सोसायटीत राहत होता. 

  तरुण मित्र मंडळ आयोजित हे शिबीर पालघरच्या विक्रमगड येथील साजन नेचर पार्क येथे होते. १ मेला 120 मुलांना घेऊन तरुण मित्र मंडळ गेलं होतं. शुक्रवारी पोहोण्यासाठी 60 मुलांना घेऊन आयोजक येथील तलावात उतरले. पण मननला पोहता येत नव्हते म्हणून तो पोहायला शिकण्यासाठी पाण्यात उतरला. जीवरक्षक जॅकेट न घालताच तो पाण्यात उतरला आणि पोहता येत नसल्यानं खोल पाण्यात जाऊन बुडाला. विक्रमगड पोलिसांनी आयोजक जतीन गांगर, डॉली गांगर, जुबेन छावडा तसेच रिसॉर्ट मॅनेजर विशाल सकपाळ आणि विनायक देशमुख यांना अटक केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.