SHARE

 

एकीकडे पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यूला 24 तास उलटत नाही तोच गुरुवारी दिवसभरात पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करण्याचे तब्बल 4 प्रकार घडल्याचे समोर आले आहेत.

1 - अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात गाडी अडवल्याच्या रागावरून ट्रॅफिक वॉर्डन विश्वनाथ राणे यांना शिवीगाळ तसंच धक्काबुक्की करण्यात आली.

2 - कुलाबा परिसरात वाहतूक हवालदार राजेंद्र पवार यांनी काळ्या काचा असलेली गाडी अडवली असता त्यांना देखील शिवीगाळ तसेच धमकी देण्यात आली.

3 - डॉकयार्ड रोड येथे बाईकस्वाराने पोलीस हवालदार महादेव कुंभार यांना जखमी केले.

4 - कुर्ल्यात थांबण्याचा इशारा देऊनही इम्तियाझ खान नावाच्या उद्दाम चालकाने ट्रॅफिक हवालदार देविदास निंबाळकर यांच्यावर गाडी घालून जखमी केले.

पोलिसांवर होणा-या शिवीगाळ, हल्ले यासारख्या प्रकारांना नेमके कोण जबाबदार आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलिसच मुंबईत सुरक्षित नाहीत, असे चित्र सध्या दिसत आहे.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या