धुलिवंदनाच्या दिवशी 375 तळीरामांवर कारवाई


धुलिवंदनाच्या दिवशी 375 तळीरामांवर कारवाई
SHARES

धुळवडीच्या दिवशी लोकांच्या आनंद आणि उत्साहाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी, वाहतूक पोलिसांनी मुंबईसह उपनगरातील 375 तळीरामांवर धडक कारवाई केली.


2952 जणांवर कारवाई

धुळवडीच्या पार्शवभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी दिवसभरात 375 मद्यापींवर कारवाई करत त्यांना शिमग्याचा चांगलाच इंगा दाखवून दिला. दरम्यान वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी दिवसभरात विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या 1342, एका गाडीवर तिघे बसणाऱ्या 186, दारू पिवून गाडी चालवणाऱ्या 375, भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या 19 आणि इतर 1030 अशा एकूण 2952 जणांवर कारवाई केली आहे.

यंदा दारू पिऊन वाहन चालवण्याच्या घटनांमध्येही किंचित घट झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी ही संख्या 687 इतकी होती. इतरही गुन्ह्यांमध्येही काही प्रमाणात घट झाल्याचे यावर्षी दिसून आले. 

दरवर्षी रंगोत्सव साजरा करताना मद्यपान करून गाडी चालवण्याबरोबरच भरधाव गाड्या चालवणे, विनाहेल्मेट मोटारसायकल चालवण्याच्या घटना घडतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसह १ हजार २९१ वाहतूक पोलीस गस्तीवर होते. ठिकठिकाणी नाकाबंदी लावून नियम तोडणाऱ्या तसेच बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवर यावेळी पोलिस कारवाई करत होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा