Advertisement

मालाडमध्ये सोने-चांदी कामगाराची हत्या

११ मे रोजी दिवसभर नितेश पोटमाळ्याबाहेर दिसून आला नाही. पत्नीही बाळंतपणासाठी गावी गेली असल्याने शेजाऱ्यांनी त्याच्या पोटमाळेयाच्या खिडकीतून डोकावले असता नितेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

मालाडमध्ये सोने-चांदी कामगाराची हत्या
SHARES
Advertisement
मुंबईच्या मालाड परिसरात पत्नीला भडकवून सोडून जाण्यास भाग पाडल्याचा राग मनात धरून २८ वर्षीय तरुणाने त्याच्याच चुलत भावाची हत्या केली आहे. या प्रकरणात मालाड पोलिसांनी हेमंत सोनी याला अटक केली आहे. या प्रकरणी मालाड पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती मालाडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.


पाच दिवसानंतर अटक

मालाडच्या कुवा रोड परिसरात सोने-चांदी गाळून मौल्यवान दागिने बनवणाऱ्यांचे अनेक गाळे आहेत. या परिसरात मृत नितेश सोनी हाही रहात असून घरातील पोट माळ्यावर तो व्यवसाय करतो. ११ मे रोजी दिवसभर नितेश पोटमाळ्याबाहेर दिसून आला नाही. पत्नीही बाळंतपणासाठी गावी गेली असल्याने शेजाऱ्यांनी त्याच्या पोटमाळेयाच्या खिडकीतून डोकावले असता नितेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक चौकशीत त्याचे काही दिवसांपूर्वी हेमंतसोबत वाद झाल्याचे उघडकीस आले.  हेमंतही परिसरात आढळून येत नसल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. अखेर पाच दिवसानंतर पोलिसांनी हेमंतला अखेर अटक केली.


दागिने, पैसे चोरले

हेमंतच्या चौकशीत तो व्यसनाच्या अधीन गेल्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली असल्याचं समोर आलं.  तिला नितेश भडकावत असल्याने हेमंतच्या मनात राग होता. याच वादातून ११ मे रोजी रात्री १ वाजता नितेश त्याच्या पोटमाळ्यावर काम करत असताना  चाकू भोसकून हेमंतने त्याची हत्या केली. हेमंतने त्याच्या दुकानात कामासाठी आलेले १० लाखांचे दागिने आणि ५ लाखांची रोख रक्कम घेऊन पळ काढल्याची कबुली दिली.हेही वाचा -

अभिनेता आदित्य पांचोलीवर बलात्काराचा आरोप, १३ वर्षांपूर्वीचं प्रकरण आलं समोर

दबंग 'लांडें'च्या कारवाईचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला धसका
संबंधित विषय
Advertisement