अभिनेता आदित्य पांचोलीवर बलात्काराचा आरोप, १३ वर्षांपूर्वीचं प्रकरण आलं समोर

एका आघाडीच्या बाॅलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने अभिनेता आदित्य पांचोली याच्याच्याविरोधात बलात्कार आणि मारहाणीची तक्रार केल्याने पांचोली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अभिनेता आदित्य पांचोलीवर बलात्काराचा आरोप, १३ वर्षांपूर्वीचं प्रकरण आलं समोर
SHARES

एका आघाडीच्या बाॅलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने अभिनेता आदित्य पांचोली याच्याच्याविरोधात बलात्कार आणि मारहाणीची तक्रार केल्याने पांचोली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईतील वर्सोवा पोलिसांना ई-मेलद्वारे यासंदर्भातील तक्रार मिळाली असून पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही घटना १३ वर्षांपूर्वीची आहे. आदित्यने मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ठोस पुराव्यांची गरज

याप्रकरणी पोलिसांनी गेल्या रविवारी आदित्यची चौकशी देखील केली आहे. तक्रारीचा ई-मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित अभिनेत्रीशी संपर्क करत माहिती जाणून घेतली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना १३ वर्षांपूर्वीची असल्याने आदित्यविरोधात गुन्हा नोंदवण्याआधी ठोस पुरावे गोळा करावे लागतील. त्यासाठी दोन्ही बाजूंची सखोल चौकशी करावी लागेल.

माझ्याविरोधातील कट

तर आदित्यच्या मते, हा माझ्याविरोधातील कट आहे. कारण मी संबंधित अभिनेत्रीविरोधा अब्रुनुकसानीचा दावा केल्याने तिच्या वकिलाने ६ जानेवारीला माझ्याविरोधात बलात्काराचं खोटं प्रकरण दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मी यासंदर्भातील १८ मिनिटांचं रेकाॅर्डिंगही न्यायालय आणि पोलिसांना दिलं आहे. त्यानंतर २५ एप्रिलला वर्सोवा पोलिस माझ्या घरी एक नोटीस घेऊन आल्यावर मला धक्का बसला. त्यावर १२ मे रोजी पोलिसांकडे जाऊन मी या प्रकरणावर सविस्तर माहिती त्यांना दिली आहे.   



हेही वाचा-

मी तंबाखूची जाहिरात करतच नाही, अजय देवगणचं चाहत्याला उत्तर

अभिनेता आदित्य पांचोलीच्या अडचणीत वाढ



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा