क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया पाहून केली हत्या

तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तीन पथके तयार केली. पोलिसांनी चौधरपाडा ते वडूनवघर दरम्यान लावलेले प्रत्येक सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी सोमनाथच्या संशयस्पद हालचाली जाणवल्यावर ताब्यात घेण्यात आलं.

क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया पाहून केली हत्या
SHARES

कर्ज फेडण्यासाठी भिवंडीतील वृद्धेची हत्या केल्याप्रकरणी सोमनाथ वाकडे आणि त्याची पत्नी नीलम वाकडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडूनवघर या गावालगतच्या तलावात २२ नोव्हेंबर रोजी सकाळी एका अनोळखी वृद्ध महिलेचा तोंड बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. तपासात हा मृतदेह चौधरपाडातील सोनुबाई कृष्णा चौधरी (७०) यांचा असल्याचं उघडकीस आलं होतं.

आरोपींकडून पोलिसांनी हत्येनंतर चोरी केलेले दागिने हस्तगत केले आहेत. धक्कादायक म्हणजे कर्ज फेडण्यासाठी क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया यासारख्या मालिका पाहून सोनुबाई यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. डोक्यात अवजड वस्तू मारल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात दिसून आलं. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तीन पथके तयार केली. पोलिसांनी चौधरपाडा ते वडूनवघर दरम्यान लावलेले प्रत्येक सीसीटीव्ही तपासले. 

 त्यावेळी सोमनाथ यांच्या संशयस्पद हालचाली जाणवल्यावर या दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यावर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. सोमनाथ हा वाहनचालक असून त्याचे वेल्डिंगचे दुकान आहे. त्याची पत्नी नीलम अंगणवाडी सेविका आहे.  सोमनाथ याने आयफोन, एअर कंडिशनर, मोटारसायकल हप्त्यावर खरेदी केले होते. हे हप्ते थकल्यामुळे त्याने महिलेची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

सोनुबाई यांचे पती पालिकेत नोकरीला होते. तिला दरमहा १५ हजार रुपये पेन्शन मिळत होती. त्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी २१ नोव्हेंबरला सोनुबाई या दुपारी आरोपींच्या घरी गप्पा मारण्यासाठी आल्या. त्यांच्या अंगावरील दागिने विकून पैसे मिळविण्याच्या हेतूने नीलमने त्यांच्या डोक्यात धोपटणे मारून खून केला. हेही वाचा -

लाचखोर भाजपा नगरसेविकाला ५ वर्षांचा कारावास

४ बोगस डॉक्टरांना अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय