मुंबईतल्या मारेकऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक


मुंबईतल्या मारेकऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक
SHARES

पालघरच्या वालिव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीला 12 मे पर्यंतची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या हत्येप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश करत आहेत. 3 मार्च 2017 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आरोपीने अपहरण केलेल्या व्यक्तीची गळा आवळून हत्या करत त्याचा मृतदेह फेकून दिला. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीचे नाव घनश्याम बीरन सिंह (39) असल्याचे समजते.

बीरन सिंह हे मूळचे बिहार राज्यतील औरंगाबादमध्ये रहाणारे होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजेश गुप्ता नावाचा व्यक्ती घनश्यामच्या घरी पाहुणा म्हणून आला होता. याच दरम्यान मृत घनश्यामची पत्नी बबली आणि राजेश गुप्ता यांच्यात प्रेम संबंध सुरू झाले. एके दिवशी राजेशने त्याची प्रेयसी म्हणजेच घनश्यामची पत्नी बबलीला तिच्या पतीला कायमचे सोडून आपल्यासोबत फरार होण्यास सांगितले. पण बबलीने पती घनश्यामला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे गुप्ताने त्याच्या प्रेमसंबंधात अडथळा येत असलेल्या प्रेयसीच्या पतीची हत्या केली. या घटनेची माहिती लागल्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई उपविभागीय अधिकारी, तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक माने, पोलीस हवालदार संजय नवले, शिवाजी पाटील आणि पोलीस नाईक गोविंद केंद्रे यांचं एक पथक तयार करण्यात आलं. राजेशच्या अटकेसाठी या पथकाला उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमध्ये पाठवण्यात आले.

या पथकाने आठवड्याभरात राजेशला अटक करण्यासाठी जवळपास 20 गावं पालथी घातली. त्यानंतर पोलिसांनी अखेर मारेकरी राजेश गुप्ताला अटक केली. पोलीस तपासणीदरम्यान आरोपीने त्याचे नाव राजेश प्रल्हाद गुप्ता (30) असून आपण कृष्णा चाळमधील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. यासह मृत व्यक्तीच्या पत्नीशी आपले अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांसमोर उघड केली. आधी दोघांनी मद्य प्राशन केले आणि नंतर घनश्यामची हत्या केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा