कोंबडी चोर

 Kandivali
कोंबडी चोर
कोंबडी चोर
कोंबडी चोर
कोंबडी चोर
कोंबडी चोर
See all

कांदिवली - चक्क कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार कांदिवलीतल्या मच्छी मार्केटमध्ये घडलाय. अज्ञात चोरट्याने मंगळवारी तब्बल 117 कोंबड्या पळवल्या. सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे.

13 जानेवारीच्या मध्यरात्री 1 वाजून 11 मिनिटांनी कोंबड्यांची वाहतूक करणारी गाडी असलम इस्माइल खुरेशी या व्यक्तीच्या दुकानासमोर उभी होती. तेव्हा कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने 117 कोंबड्या पळवल्या. सकाळी जेव्हा असलमने दुकान उघडलं तेव्हा सर्व कोंबड्या गायब झाल्या होत्या. याप्रकरणी दुकानदार असलमने समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. काही दिवसांपूर्वी समतानगरच्या माणिकभाई या व्यक्तीच्या दुकानातूनही 200 कोंबड्या चोरीला गेल्या होत्या.

पोलिसांचं म्हणणं आहे की, या दोन्ही चोरीच्या घटनेत एकाच चोराचा समावेश असू शकतो. सध्या समतानगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Loading Comments