खाडीत बुडून तिचा मृत्यू

 Mumbai
खाडीत बुडून तिचा मृत्यू

धारावी - सांताक्रुझच्या ओल्ड एअरपोर्ट कॉलनीत राहणाऱ्या तरुणीचा धारावीच्या टी जंक्शन उड्डाणपुलाजवळील खाडीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. रोशनी शिवगण असं त्या तरुणीचं नाव आहे. ती महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी तिचा प्रियकर प्रवीण चव्हाण (२५) याला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ९. ३० वाजता प्रवीण चव्हाण रोशनीला घेऊन धारावीत राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. दरम्यान ते दोघे धारावीतल्या टी जंक्शन उड्डाण पुलाजवळील खाडीजवळ थांबले असता रोशनीचा पाय घसरून ती खाडीत पडली. प्रवीणने तिला वाचवण्यासाठी हात दिला असता रोशनीनं त्यालाही पाण्यात खेचलं. त्यामुळे तोही पाण्यात पडला. प्रवीणला पोहता येत असल्यामुळे तो बचावला पण रोशनीला बाहेर काढणं त्याला जमलं नाही. दरम्यान, रोशनी गाळात फसली आणि बुडाली. या घटनेची माहिती मिळताच धारावी पोलीस ठाण्यातले निरीक्षक जावडेकर, उपनिरीक्षक आनंद मुनेश्वर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीनं रोशनीला गाळाबाहेर काढलं. मात्र शीव रुग्णालयात उपचारांसाठी नेताना तिचा रस्त्यातच अंत झाला. ही हत्या, अपघात की आणखी काही याबाबत धारावी पोलीस तपास करत आहेत.

Loading Comments