माझ्यावर गुन्हा का नोंदवला? मोजोस बिस्ट्रोच्या मालकाचा सवाल


माझ्यावर गुन्हा का नोंदवला? मोजोस बिस्ट्रोच्या मालकाचा सवाल
SHARES

माझ्यावर पोलिसांनी गुन्हा का नोंदवला आहे, हे मला अद्याप समजलेलं नाही, असा सवाल मोजोस बिस्ट्रो रेस्टाॅरंट आणि पबचा डायरेक्टर ड्युक तुलीने ना. म. जोशी मार्ग पोलिसांकडे जबाब नोंदवताना केला आहे. कमला मिल कंपाऊंड आगप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी सूमोटो नोटीस काढत मोजोस बिस्ट्रोच्या मालकांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं होतं. त्यानुसार गुरूवारी रात्री उशीरा ड्युक तुली आणि युग पाठक यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे.


वेळोवेळी सहकार्य

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्युक तुलीने जाबाबात म्हटलं आहे की, माझ्यावर पोलिसांनी गुन्हा का नोंदवला आहे, हे मला अद्याप समजलेलं नाही. या दुर्घटनेत अनेकजण मृत्यूमुखी पडले हे ऐकून मलाही दु:ख झालं. आम्ही पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करत आहोत. मोजोसची सर्व कागदपत्रे आणि परवानग्या आम्ही पोलिसांकडे सादर केल्या आहेत. कारवाई दडपण्यासाठी मी कोणतंही राजकीय वजन वापरलं नाही.


गुन्ह्याची नोंद

ड्युक तुलीसोबतच पोलिसांनी युग पाठकचाही जबाब नोंदवला आहे. तब्बल ४ तास चौकशी करून पोलिसांनी हा जबाब नोंदवला आहे. कमला मिल कंपाऊंडध्ये वन-अबोव्ह पबला लागलेल्या आगीनंतर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर मुंबई महापालिकेने कमला मिलमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात केली. महापालिके्च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनधिकृत बांधकाम असणाऱ्या दोषींवर गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामध्ये मोजोसच्या मालकांवर देखील एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.


सुमोटो नोटीसनंतर जाग

या घटनेनंतर पोलिसांनी मोजोसचे मालक ड्युक तुली आणि यश पाठक यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र पबला लागलेल्या दुर्घटनेनंतर दोघेही पोलिसांसमोर येत नव्हते. त्यावेळी पोलिसांनी दोघांच्या नावाने सुमोटो नोटीस जारी केल्यानंतर या दोघांनी गुरूवारी चौकशीसाठी येत असल्याचं कळवलं.



हेही वाचा-

मोजोसचे मालक हाजीर हो…

कमला मिल आग: 'वन अबोव्ह'च्या २ मॅनेजरला अटक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा