त्यानेच रचला स्वत:च्या आत्महत्येचा डाव

 Chembur
त्यानेच रचला स्वत:च्या आत्महत्येचा डाव

चेंबूर - कर्नाटकमधील एन सतिश (37) या सोने व्यापाऱ्याच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे बुधवारी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. रियाज कमालुद्दीन, कुमार सरवनन आणि मार्टीन अशी या तिघांची नावे आहेत.

सतिशने स्वत: प्लॅन करून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सतिशने तिघा मित्रांना आपल्या प्लॅनिंगमध्ये सहभागी करून घेतले. आत्महत्येनंतर हाताच्या नसा कापून या घटनेला हत्येचे स्वरूप देण्याचा सतिशचा प्लॅन होता. त्यानुसार सतिशने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर तिघा मित्रांनी त्याच्या हाताच्या नसा कापून हत्येचे स्वरूप दिले.

सतिशवर मोठे कर्ज होते. आत्महत्या केल्यानंतर विमा कंपन्यांकडून इन्शुरन्सचे पैसे मिळत नाही. त्यामुळे हत्या झाल्याचे भासवून विमा कंपन्यांकडून पैसा उकळण्याचा सतिशचा प्लॅन होता. त्यामुळे पोलिसांनी या तिघा आरोपींवरील हत्येचा गुन्हा रद्द करत आत्महत्येस मदत केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

Loading Comments