मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, चोरीच्या आरोपावरून दोघांची नग्न धिंड


मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, चोरीच्या आरोपावरून दोघांची नग्न धिंड
SHARES

मुंबईच्या कांदीवली परिसरात चोरीच्या आरोपावरून ५ जणांनी दोघा जणांना बांधून त्यांना चाबकाने फटके दिले आहेत. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्या दोघांना अर्ध नग्नकरून  त्याचे मुंडन करून धिंड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या  घटनेची गंभीर दखल घेत कांदीवली पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

 हेही वाचाः-   दिलासादायक! फ्लिपकार्ट आता मराठी भाषेत उपलब्ध                                                     

कांदिवलीच्या जनता काँलनी, काच पाडा परिसरात राहतात. त्याच परिसरातील एका कंपनीत तक्रारदार आणि त्याचा मित्र कामाला आहे. त्या ठिकाणाहून एक मोबाइल आणि ३ हजार रुपये चोरीला गेले होते. त्यावरून पाच आरोपींनी दोघांना एका खोलीत बांधून ठेवले. त्या दोघांनी गुन्ह्यांची कबूली द्यावी. म्हणून आरोपींनी त्याच्यावर चाबकाचे वळ येईपर्यंत मारहाण केली. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींना अर्धनग्न करून त्याचे मुडंन ही केले. तसेच त्या दोघांची आरोपींनी परिसरात वाजत गाजत धिंड काढून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल मिडियावर वायरल केले. मुंबई सारख्या शहरात असा प्रकार घडल्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा धाक आहे की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेत कांदिवली पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा