SHARE

मुंबईच्या ट्राॅम्बे परिसरातील नेव्ही अधिकाऱ्यांच्या बेसवर एका सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. केसर सिंग असं या मृत सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. मृतदेह जवळील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेलं आहे. या प्रकरणी ट्राॅम्बे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. 


कारण अज्ञात

 गुरूवारी नेहमीप्रमाणे सिंग ड्युटीवर आले होते. नेव्हीच्या वाॅच टाॅवरवर ते कार्यरत होते. त्यांनी सकाळी ११.३० च्या दरम्यान हातातील एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलं नाही. गोळीच्या आवाजाने अलर्ट झालेल्या नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी सिंग यांच्या टाॅवरच्या दिशेने धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिंग यांना अधिकाऱ्यांनी जवळील रुग्णालयात नेलं. डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.  हेही वाचा - 

Exclusive : गँगस्टर गुरू साटम दक्षिण अफ्रिकेत, आर्थिक व्यवहार सांभाळणारा हस्तक अटकेत

पुस्तकातली कथा वाचून ब्रँच मॅनेजरने फसवणुकीचा कट रचला
संबंधित विषय
ताज्या बातम्या