माहीममधून ड्रग्ज तस्कराला अटक, एनसीबीची कारवाई

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून एनसीबीने ड्रग्ज तस्कारांविरोधात मोहीम उघडून कारवाया सुरू केल्या आहेत. माहीम परिसरातील स्थानिक नागरिकांनी ड्रग्जची तस्करी होत असल्याची तक्रार एनसीबीकडे केली होती.

माहीममधून ड्रग्ज तस्कराला अटक, एनसीबीची कारवाई
SHARES

मुंबईच्या माहीम परिसरातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना धाड टाकून ताब्यात घेतलं आहे. या ड्रग्ज तस्करीत १५ ते २० अल्पवयीन मुलांचा समावेश होता. ड्रग्जच्या विळख्यातून या मुलांची एनसीबीने सुटका केली आहे. या प्रकरणी एनसीबीने ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. 

एनसीबीने टाकलेल्या धाडीत चरस आणि हशीसचा साठा जप्त केला आहे. लहान मुलांना व्यसनांच्या अधीन करायचे त्यांच्यामार्फत ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याचं समोर आले आहे. या कारवाईनंतर अल्पवयीन मुलांचं एनसीबीकडून समुपदेशन करण्यात आले असून त्यांना सोडण्यात आलं आहे.

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून एनसीबीने ड्रग्ज तस्कारांविरोधात मोहीम उघडून कारवाया सुरू केल्या आहेत. माहीम परिसरातील स्थानिक नागरिकांनी ड्रग्जची तस्करी होत असल्याची तक्रार एनसीबीकडे केली होती. त्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली माहीम परिसरात पाळत ठेवून ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या पठाण गॅंगचा म्होरक्या गँगस्टर सोनू पठाण याला मागील आठवड्यात एनसीबीने अटक केली आहे. जानेवारीमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. हा कारखाना अंडरवर्ल्ड माफिया करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाण याच्याशी संबंधित होता. चिंकू पठाणला अटक करण्यात आली होती. चिंकूच्या चौकशीत सोनू पठाणचं नाव समोर आलं होतं. तेव्हापासून सोनू फरार झाला होता. एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते.



हेही वाचा -

मुंबईतील 'या' भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबानं होणार

तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा