२० लाखांचा चरस जप्त, दोघांना अटक


२० लाखांचा चरस जप्त, दोघांना अटक
SHARES

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कक्षानं मोठी कारवाई करत दोन ड्रग्ज तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. मुंब्रा परिसरातून या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडून २० लाखांचं साडे सहा किलो चरस जप्त केले आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात जम्मू-काश्मीरमधून येणाऱ्या अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. यात महिलांचाही सहभाग असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत अधिकाऱ्यांनी मुंब्रा परिसरात छापा घालून अब्दुल करीम युनूस कारोबारी उर्फ लाला भाई आणि मोहम्मद अय्याज शेख उर्फ वॉल भाई यांना अटक केली. लाला भाई याची पत्नी रुबीना आणि रेहाना कय्यूम शेख या दोन महिलांचाही यात सहभाग असल्याचं समोर आलं. पण पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच त्या पसार झाल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा