पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी आमदार रमेश कदमला अटक

  Mumbai
  पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी आमदार रमेश कदमला अटक
  मुंबई  -  

  भायखळा जेलसमोर पोलीस अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी आमदार रमेश कदम याला नागपाडा पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

  अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये असलेला राष्ट्रवादी पक्षाचा निलंबित आमदार रमेश कदम याला वैद्यकिय तपासणीसाठी गुरुवारी 18 मे रोजी भायखळा जेलमधून जे. जे. रुग्णालयात नेण्यासाठी बाहेर काढले होते. त्यावेळी त्याला नेण्यासाठी वेळीच वाहन उपलब्ध न झाल्यानं त्याला नातेवाईकांना भेटू दिलं नाही. यावेळी संतापलेल्या कदम याने बंदोबस्तावर असलेल्या एपीआय मनोज पवार यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांना धमकावल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने या प्रकरणाची दखल पोलीस आयुक्त पडसलगीकर यांनी घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार कदम याच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी कदम याला अटक करून न्यायालयासमोर सादर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस कदम याची सखोल चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले.


  हेही वाचा - 

  आमदार रमेश कदमची पोलिसांना शिवगाळ करतानाचा व्हिडिओ वायरल

  आमदार रमेश कदमांच्या अडचणी वाढल्या


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.