स्वयंसेवी संस्थेचा विद्रूप चेहरा, अॅसिड हल्ल्यातील पीडिता ललिताचे फोटो वापरून लाखोंची फसवणूक


स्वयंसेवी संस्थेचा विद्रूप चेहरा, अॅसिड हल्ल्यातील पीडिता ललिताचे फोटो वापरून लाखोंची फसवणूक
SHARES

शहरातील ७ अॅसिड हल्ल्यातील पीडित तरुणींचे फोटो संकेतस्थळावर वापरून त्यांच्या नावाने पैसे गोळा करणाऱ्या दिल्लीतील प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेच्या संचालक महिलेविरोधात दौलतबी खान या पीडित तरुणीने वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे.


काय आहे प्रकार?

दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक महिलेने अॅसिड हल्ल्यातील पीडिता ललिताबेन बन्सी हिची २०१४ मध्ये भेट घेतली होती. त्यावेळी त्या महिलेने ललिताचे छायाचित्र आणि मोबाईल क्रमांक वापरून संस्थेच्या वतीने आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार ललिताने अपल्यावरील अन्यायाची पूर्ण माहिती संस्थेच्या संचालक महिलेला दिली. या संचालक महिलेने मोठी रक्कम जमा झाल्यावर पुन्हा संपर्क साधू असं ललिताला सांगितलं.

त्यानंतर ललिलाने काही दिवसांनी संस्थेच्या संचालक महिलेला फोन केला असता. आरोपी संस्थेच्या संचालक महिलेने ललिताला तिच्या नावे १ लाख १० हजार ७०३ एवढी रक्कम मदत म्हणून जमा झाल्याचं सांगितलं. तसेच ही रक्कम लवकरच तिला देण्यात येईल, असंही स्पष्ट केलं. मात्र त्या दिवसानंतर त्या महिलेने ललिताशी कधीही संपर्क केला नाही. तर ललिताने संबधित महिलेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता. त्या संस्थेकडून तिला दाद देण्यात आली नाही.


कसं आलं प्रकरण उघडकीस?

शहरात अॅसिड हल्ल्यातील पीडितांठी 'साहस' ही संस्था कार्यरत आहे. तक्रारदार दौलतबी खान (३४) या संस्थेचं काम पाहतात. नोव्हेंबरमध्ये संस्थेच्या झाकीरा शेख अॅसिड हल्ल्यातील पीडितेसाठी मदत कार्य करत असताना. त्यांना एका संकेतस्थळावर ललिताबेन बन्सीचे छायाचित्र आणि तिची कहाणी दिसली. त्यावेळी त्यांनी ललिता यांच्याकडे याबाबतची माहिती घेतली. ललिताने या दिल्लीतील प्रसिद्ध संस्थेने केलेल्या फसवणुकीची माहिती खान यांना दिली.


कारवाईला चालढकल

त्या संस्थेने केवळ ललिताचे नव्हे, तर तक्रारदार दौलतबी खान यांच्यासह रेश्मा शेख, सायराबानो इरफान, आरती किशोर ठाकूर, शब्बो शेख आणि सिद्धार्थ ससाणे या अॅसिड हल्ल्यातील पीडितांचे छायाचित्र त्यांच्या परवानगीशिवाय वापरल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर खान यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन महिना उलटला. मात्र पोलीस कोणतीही कारवाई करत नव्हते. अखेर नोव्हेंबर महिन्यात या पीडित महिलांनी मुंबई पोलीस मुख्यालयात जाऊन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात पीडितांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी गुन्हा नोंदवण्यात आला.


कोण आहे ललिता?

मूळची उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथील ललितावर तिच्या भावांनीच परस्पर द्वेषातून २०१२ साली अॅसिड हल्ला केला होता. त्यात ललिताचा पूर्ण चेहरा जळाला होता. तेव्हापासून आतापर्यंत ललितावर १७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एका राँग नंबरने ललिताचं राहुल नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम जुळलं. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्येच या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अॅसिड हल्ल्यानंतर ललिताला 'साहस फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेने मदतीचा हात दिला. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ललिताला मदत करण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळीही पुढे आली. अभिनेता विवेक ओबेरॉयने ललिताला ठाण्यात एक फ्लॅट आहेर म्हणून दिला, तर डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी तिच्या लग्नासाठी कपडे आणि नेकलेस तिला भेट दिलं होतं.



हेही वाचा - 

एका मिस्ड कॉलने जीवन बदलले, अॅसिडहल्ल्यातील पीडितेसोबत 'त्याने' केले लग्न


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा