अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच, एनआयएचा खुलासा

सचिन वाझे यांनी सीसीटीव्हीमध्ये काही कळू नये यासाठी पांढरा कुर्ता आणि पायजामा घातला होता. तसंच डोक्याला रूमाल बांधला होता. त्यांनी तोंडावर मास्कही लावला होता.

अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच, एनआयएचा खुलासा
SHARES

मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं एनआयएने स्पष्ट केलं आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने पीपीई किट घातलेलं नसून साधा कुर्ता-पायजमा घातला असल्याचंही एनआयएनं म्हटलं आहे. आहे. 

एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी सीसीटीव्हीमध्ये काही कळू नये यासाठी पांढरा कुर्ता आणि पायजामा घातला होता. तसंच डोक्याला रूमाल बांधला होता. त्यांनी तोंडावर मास्कही लावला होता. त्यामुळे त्यांचे केवळ डोळेच उघडे दिसत होते. त्यामुळे ओळख पटण्यात अडचणी येत होत्या. 

दरम्यान, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज कारमधून बॅग, डायरी, शर्ट, पैसे मोजण्याची मशीन आणि साडेपाच लाख रुपये जप्त केले आहेत.  एनआयए अधिकाऱ्यांकडून या मर्सिडीज कारची कसून चौकशी सुरु आहे. मुख्य म्हणजे जे कपडे मिळाले आहेत, त्यामध्ये एक शर्टही आहे. हे शर्ट वाझेंनी २४ तारखेला घातलं होतं. त्यामुळे आता संशयाची सर्व दिशा ही वाझेंकडेच जात आहे. हेही वाचा -

सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

सचिन वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचं मशीन, ५ लाखही सापडले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा