सचिन वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचं मशीन, ५ लाखही सापडले

वाझे यांचं घर, ऑफिस, गाडी अशा विविध गोष्टींचा तपास करण्यात येत आहे. वाझे वापरत असलेली मर्सिडीज गाडी एनआयएने जप्त केली आहे.

सचिन वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचं मशीन, ५ लाखही सापडले
SHARES

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली आहे. वाझे यांचं घर, ऑफिस, गाडी अशा विविध गोष्टींचा तपास करण्यात येत आहे. वाझे वापरत असलेली मर्सिडीज गाडी एनआयएने जप्त केली आहे. या गाडीच्या झडतीनंतर एनआयएने धक्कादायक खुलासा केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून ही गाडी ताब्यात घेण्यात आली.  वाझे वापरत असलेल्या या मर्सिडीज गाडीत चक्क नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. तसंच या गाडीत ५ लाख रुपयेही आढळून आले आहेत. वाझेंच्या गाडीत पैसे मोजण्याचं मशीन का ठेवण्यात आलं होतं, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओची खरी नंबरप्लेट आणि आणखी काही बनावट नंबरप्लेटही या गाडीत सापडल्या आहेत. याशिवाय, मर्सिडीजमध्ये केरोसीनची एक बाटली सापडली आहे. या केरोसीनच्या साहाय्याने सचिन वाझे यांनी डोक्यावरील कॅप आणि फेसशिल्ड जाळले होते. 

सचिन वाझे काम करत असलेल्या क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या ऑफिसचीही कसून तपासणी केली. १५ मार्चच्या रात्री आठच्या सुमारास एनआयएची दोन पथकं मुंबई पोलीस आयुक्तालयातील नवीन इमारतीत चौथ्या माळ्यावर असलेले क्राईम इंटेलिजन्स युनिटचे कार्यालय जिथे सचिन वाझे बसायचे या कार्यालयाची पूर्ण झाडाझडती घेतली. त्या कार्यालयातून सचिन वाझे यांचा मोबाईल लॅपटॉप टॅब आणि स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या गाडी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.



हेही वाचा -

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा