महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि सचिन वाझे प्रकरणावरून भाजप ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या दोन्ही मुद्द्यावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.
एका बाजूला नागपूरसारख्या शहरांत कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांत जागा नाही, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसंच आपल्या हस्तकांना हाताशी धरून उद्योजकांना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना बनवत आहे, असे आरोप अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केले आहेत.
सचिन वाझे प्रकरणात तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या? या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नसलं तरी अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा दावा एनआयएने केला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने पीपीई किट घातलेलं नसून साधा कुर्ता-पायजमा घातला आहे, असं एनआयएने म्हटलं आहे.
हेही वाचा- सचिन वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचं मशीन, ५ लाखही सापडले
जहां एक तरफ #Nagpur जैसे शहरो में #Corona मरीज़ों को भरती करने की भी अस्पतालों मे जगह नही है,वहाँ दूसरी तरफ #Maharashtra सरकार #covid centres में भ्रष्टाचार कर रही है और उद्योगपातियों को डराके उनसे वसूली करने की योजनाए अपने ही कुछ पिट्ठुओं के साथ मिलकर बना रही है #SachinWaze 👎
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 17, 2021
मुंबई पोलीस (mumbai police) दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांचा अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणातील कथित सहभागाचा तपास एनआयए करत आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. या प्रकरणातही संशयाची सुई सचिन वाझे यांच्यावरच आहे.
त्यामुळे भाजपकडून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. एवढंच नाही तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली आहे. वाझे यांचं घर, ऑफिस, गाडी अशा विविध गोष्टींचा तपास करण्यात येत आहे. वाझे वापरत असलेली मर्सिडीज गाडी एनआयएने जप्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून ही गाडी ताब्यात घेण्यात आली. वाझे वापरत असलेल्या या मर्सिडीज गाडीत चक्क नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. तसंच या गाडीत ५ लाख रुपयेही आढळून आले आहेत. वाझेंच्या गाडीत पैसे मोजण्याचं मशीन का ठेवण्यात आलं होतं, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
(amruta fadnavis criticized thackeray government over sachin vaze issue)
हेही वाचा- दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी