झाकीर नाईकविरोधात रेड कॉर्नर नोटीस नाहीच! भारतीय तपास यंत्रणांना झटका

इंटरपोलने इस्लामचा वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची भारताची विनंती फेटाळली आहे. भारताने केलेल्या विनंती अर्जामध्ये राजकीय तसेच धार्मिक भेदभाव दिसून येत असल्याचंही नोटीस रद्द करताना इंटरपोलने म्हटलं आहे.

झाकीर नाईकविरोधात रेड कॉर्नर नोटीस नाहीच! भारतीय तपास यंत्रणांना झटका
SHARES

इंटरपोलने इस्लामचा वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची भारताची विनंती फेटाळली आहे. भारताने केलेल्या विनंती अर्जामध्ये राजकीय तसेच धार्मिक भेदभाव दिसून येत असल्याचंही नोटीस रद्द करताना इंटरपोलने म्हटलं आहे. अशा प्रकारे विनंती अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे भारतीय तपास यंत्रणांना मात्र मोठा झटका बसला आहे.


भारताची विनंती नियमांना धरून नाही!

२४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या इंटरपोलच्या १०२व्या बैठकीत हा निर्णय झाला असून भारताची विनंती फेटाळताना भारतीय तपास यंत्रणांवर देखील ताशेरे ओढण्यात आले आहेत. भारताची विनंती इंटरपोलच्या नियमांना धरून नसल्याचा दावा करत पुरेसे पुरावे नसल्याचं देखील इंटेरोपोलनं नमूद केलं आहे. या गोष्टीला आंतरराष्ट्रीय महत्त्व नसल्याचंही इंटरपोलकडून सांगण्यात आलं आहे.


झाकीर नाईकचा डेटा नष्ट

झाकीर नाईक विरोधातील रेड कॉर्नर नोटीसची विनंती फेटाळताच इंटरपोलने जगभरातील आपल्या कार्यालयांना झाकीर नाईकचा संपूर्ण डेटा नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.


इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी कायम

दोन धर्मांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी झाकीर विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यासाठी मे महिन्यात भारताकडून अर्ज करण्यात आला होता. भारत सरकारने झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर याआधीच बंदी घातली असून नाईकच्या शाळेवर देखील कारवाई करण्यात आली आहे. मे २०१६ पासून झाकीर नाईक फरार असून सध्या झाकीर नाईक मलेशियात असल्याची माहिती आहे.


दहशतवादी झाकीरचे फॉलोअर्स

२॰१६ साली बांग्लादेशातील ढाका इथं दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा झाकीर नाईकचं नाव समोर आलं होतं. या हल्ल्यातील दशतवादी हे झाकीरचे फॉलोअर्स असल्याचंदेखील समोर आलं होतं. त्यानंतर भारतातील तपास यंत्रणांनी झाकीरवर फास आवळण्यास सुरुवात केली होती. झाकीरच्या पीस टीव्हीवर बांग्लादेशनंही बंदी घातली होती.हेही वाचा

झाकीर नाईक प्रकरणी चार अधिकारी निलंबित


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा