कुरारमध्ये सापडल्या दीड कोटींच्या जुन्या नोटा

 Kurar Village
कुरारमध्ये सापडल्या दीड कोटींच्या जुन्या नोटा
Kurar Village, Mumbai  -  

कुरार - कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिंडोशी कोर्टाजवळ शुक्रवारी एका कारमध्ये 500 आणि 1 हजाराच्या जुन्या नोटांनी भरलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी हितेश देढियाला पोलिसांनी अटक देखील केली आहे.प्रत्यक्षदर्शी प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार एका सफेद रंगाच्या स्कॉर्पिओ कारमधील व्यक्तींनी एस. आर. ए. या इमारतीच्या सबाना कंपाउंडसमोर पैशाने भरलेली बॅग फेकत पळ काढला. ते पाहून स्थानिकांचा संशय बळावला. त्यामुळे स्थानिकांनी कारचा पाठलाग केला आणि कारमधील व्यक्तींना पकडून ठेवले. तसेच पोलिसांना संपर्क करून याची माहिती देखील दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस तिथे दाखल झाले. यामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक करत कार आणि 1 कोटी 53 लाख 84 हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांनी भरलेली बॅग देखील ताब्यात घेतली. 

Loading Comments