पवईतून 1 कोटी 70 लाखांच्या नोटा जप्त

Powai
पवईतून 1 कोटी 70 लाखांच्या नोटा जप्त
पवईतून 1 कोटी 70 लाखांच्या नोटा जप्त
See all
मुंबई  -  

मुंबई - नोटाबंदीला पाच महिने उलटले असले तरी अजूनही चलनातून रद्द झालेल्या नोटा पकडल्या जाण्याचं थांबत नाहीये. महाराष्ट्र एटीएसने मुंबईच्या पवई परिसरातील एका ऑफिसमधून 1 कोटी 70 लाखांच्या 1000 आणि 500 च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 

या प्रकरणी एटीएसने अजय गुप्ता(36) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पवईच्या साकी विहार येथील एका ऑफिसमध्ये कोट्यावधींचं रद्द झालेलं चलन असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकून एटीएसने 1 कोटी 70 लाखांचं चलन जप्त केलं. "रद्द झालेल्या या नोटा 50 टक्के दंड भरून आरबीआयमध्ये जमा करण्याचा आरोपीचा प्लॅन होता. त्यासाठी तो 31 मार्चला आरबीआयला गेला देखील होता. पण त्याचा नंबरच न आल्याने हे पैसे घेऊन तो आपल्या ऑफिसला परतल्याचा कबुलीजबाब आरोपीने एटीएसला दिला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.