राष्ट्रीयकृत बँकेतुन बोलत असुन, तुमचे बँक खाते लवकरच बंद असल्याचे सांगत समोरच्या व्यक्तीला गंडा घालणा-या ठकाला वडाळा टीटी पोलिसानी झारखंड येथुन पकडले आहे. या ठकसेनाने ५ लाख ८४ हजारांचा गंडा घालत बँकेतील सर्व पैसे पेटीएम मध्ये वळविल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचाः- विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त
गंगाधर दुखन मंडल (२१) असे अटक आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. अशातच त्यांना फोन आला. बँकेतून मधुन बोलत असल्याचे सांगत त्यांचे बँकेतील खाते बंद होणार असल्याचे सांगितले. तसेच हे सर्व पैसे सुरक्षित खात्यात वळविण्यासाठी त्याने तक्रारदार यांच्याकडे बँक खात्याची माहिती मागितली. त्यानुसार, तक्रारदार यांनी सर्व माहिती दिली. मात्र काही क्षणात त्यांच्या खात्यातुन ५ लाख, ८४ हजार रुपये काढले गेल्याचा संदेश आला. यावेळी त्यांनी बँकेत फोन केला असता, त्यांनी अशा प्रकारचा कोणताही फोन बँकेतुन आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने तत्काळ वडाळा टीटी पोलीस ठाणे गाठुन, याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
हेही वाचाः- येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार- उद्धव ठाकरे
पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तांत्रीक पद्धतीने तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसानी आरोपीची माहिती घेत असताना आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हा १८ आयएम .इ. आय. क्रमांकावर वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या आय .एम. इ .आय. क्रमांकाची माहिती घेतली असता त्यावर ४०२ मोबाईल क्रमांक वापरण्यात आले होते. तर सिम कार्ड हे पश्चिम बंगाल येथिल पत्त्यांचे असल्याने नक्की त्यांचा ठावठिकाणा समजून येण्यास अडचण निर्माण झाली होती. तसेच आरोपीचे बँक खाते हे गुजरात पत्ता वरील असल्याने पोलीस संभ्रमात होते. मात्रा या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास तांत्रिक मदतीच्या साहाय्याने सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय बिराजदार करीत होते. यावेळी आरोपी हा झारखंड य्ोथे असल्याचे समजले. तसेच येथील डुमका जिल्हयातील जोंका गावात राहत असल्याचे समजले. पोलीस या ठिकाणी धडकले, मात्र तो शेतात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसानी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शेतात जाऊन या ठगाच्या मुसक्या आवळल्या. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले