माटुंगा लेबर कॅम्प मध्ये टाकीसाफ करताना शाॅक लागून एकाचा मृत्यू

कोणतिही सावधगिरी न बाळगता गोंडा याला टाकी साफ करण्यासाठी उतरल्याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

माटुंगा लेबर कॅम्प मध्ये टाकीसाफ करताना शाॅक लागून एकाचा मृत्यू
SHARES

माटुंगा येथे रेल्वे कॅम्प परिसरात टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या २१ वर्षीय तरुणाचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १ वा. घडली आहे. बाबू गोंडा असे या मृत तरुणाचे नाव आहे. कोणतिही सावधगिरी न बाळगता गोंडा याला टाकी साफ करण्यासाठी उतरल्याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

माटुंग्याच्या पश्चिम रेल्वे अधिकारी निवासस्थानच्या टेरेसवर पाण्याची टाकी आहे. बिल्डिंगला पाणी पुरवण्यासाठी असलेल्या पंपला शाँक लागत असताना ही, खात्री न बाळगता गोंडा याला पाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरवले. त्यावेळी शाँक लागून गोंडा हा जागीच बेशुद्ध झाला.  त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता. डाॅक्टरांनी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाहू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणतिही खबरदारी न घेता, गोंडा याला टाकी साफ करण्यासाठी उतरवल्या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी गोंडा याला टाकी साफ करण्यास सांगणाऱ्या व्यक्ती विरोधात ३०४ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यास सांगितला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ, फेऱ्या मात्र कमीच

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा