लकडावाला बनावट फसवणूक प्रकरणात आणखी एकाला अटक

युसुफ लकडावाला आणि मोहन नायर नावाच्या व्यक्तीने या जमिनीचे बनावट कागदपत्र बनवले. या खरेदी विक्रीत शौकत घोरी हा दलाल होता. या तिघांनी मिळून ‘ऍफेडिव्हीट कम डीड ऑफ कन्फर्मेशन’ करत, त्याने या जमिनीचा खोटा खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचे दाखवून ते मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केले.

लकडावाला बनावट फसवणूक प्रकरणात आणखी एकाला अटक
SHARES

मुंबईतल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला फसवणूक प्रकरणात लकडावालाला जामीन राहणाऱ्यास ही आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. शौकत सय्यद मसहुर घोरी (५०) अशी या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच लकडावालाला बिर्याणी आणि दाढी करण्यासाठी परवानगी दिल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.


नेमकं काय आहे प्रकरण 

खंडाळा येथील जमिनीला मोठे भाव असल्याने तेथील एकाच जागेवर असलेल्या चार एकर मोकळ्या जागेवर युसुफ लकडावाला यांची नजर होती. मात्र ही जमिन कुणाच्या नावावर आहे. याची माहिती मिळत नव्हती. तसेच कुणी त्या जमिनी विक्रीसाठी ही पुढे येत नव्हते. त्यावेळी युसुफ लकडावाला आणि मोहन नायर नावाच्या व्यक्तीने या जमिनीचे बनावट कागदपत्र बनवले. या खरेदी विक्रीत शौकत घोरी हा दलाल होता. या तिघांनी मिळून ‘ऍफेडिव्हीट कम डीड ऑफ कन्फर्मेशन’ करत, त्याने या जमिनीचा खोटा खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचे दाखवून ते मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केले.


घोरीचा सहभागही निश्चित

कागदरपत्रांच्या छाननीत ही कागदपत्रे खोटी असल्याचे पुढे आल्यानंतर जितेंद्र बडगुजर यांच्या तक्रारीनुसार लकडावालावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करत, लकडावालाला काही दिवसांपूर्वी अटक केली. पुढील तपासात घोरीने या कागदपत्रांवर मुंबईतील नोंदणी क्रमांक वापरले. तसेच मूळ कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात घोरीने लकडावालाला मदत केली, असे आरोप आहेत. या प्रकारात आणखी एका दलालाचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून, त्याचा शोध सुरू आहे. या बाबतची मूळ कागदपत्रे गहाळ झाली असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

विकासक लकडावालाने खाल्लेली बिर्याणी पोलिस अधिकाऱ्यांना महागात पडली

दक्षिण मुंबई मतदार संघातून ७५ लाखांची रोकड हस्तगत


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा