एक लाखांच्या बनावट नोटांसह एकाला अटक

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या रिंटू नाझी हुसेन शेख (३०) याला खंडणी विरोधी पथकाने दानापाणी बंदर येथून मंगळवारी सांयकाळी अटक केली. झडतीत त्याच्याकडे २ हजार रुपयांच्या ४४ नोटा म्हणजेच ८८ हजार आणि पाचशेच्या ३४ नोटा म्हणजेत १७ हजार रुपये असे एक लाख पाच हजार रुपये आढळून आले.

एक लाखांच्या बनावट नोटांसह एकाला अटक
SHARES

गुन्हे शाखेने दाणाबंदर येथून एका तरूणाला अटक करुन त्यांच्याजवळून तब्बल एक लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या अाहेत. उच्च दर्जाचा कागद, हुबेहूब छपाई आणि प. बंगालमधून पुरवठा यामुळे सीमेपलीकडे बनावट नोटांचे छापखाने पुन्हा सुरू झाल्याचे या कारवाईतून निदर्शनात आले आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुका तोंडावर आल्या असताना बनावट नोटा बाजारात आणून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा आरोपींचा मानस असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.


पश्चिम बंगालमधून नोटा

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या रिंटू नाझी हुसेन शेख (३०) याला खंडणी विरोधी पथकाने दानापाणी बंदर येथून मंगळवारी सांयकाळी अटक केली. झडतीत त्याच्याकडे २ हजार रुपयांच्या ४४ नोटा म्हणजेच ८८ हजार आणि पाचशेच्या ३४ नोटा म्हणजेत १७ हजार रुपये असे एक लाख पाच हजार रुपये आढळून आले. नोटांवरील उत्कृष्ट छपाईमुळे या नोटा खऱ्या की खोट्या हे सुरुवातीला समजत नव्हते. मात्र, या नोटांवर एकच अनुक्रमांक असल्याने त्या बनावट असल्याची खात्री पटली. 


२ टक्के कमिशन

मालदा येथील एका व्यक्तीने या नोटा देऊन त्या मुंबईत चलनात आणण्यास सांगितले होते. याबदल्यात त्याला २ टक्के कमिशन मिळणार होते, अशी माहिती अारोपीने चौकशीत दिली. आरोपी हा मुंबईत हमालीचे काम करतो. न्यायालयाने त्याला २४ डिसेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.


बनावट नोटा बांग्लादेशमार्गे

 निश्चलनीकरणानंतर पाचशे किंवा दोन हजाराच्या नोटांची रंगीत छायांकित प्रत काढून चलनात आणण्याचे तुरळक प्रकार घडले होते. मात्र, हुबेहूब नोटा हस्तगत होण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे. निश्चलनीकरणाआधी हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बांग्लादेशमार्गे प. बंगालमध्ये येत. बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या प. बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद, नदीया, २४ परगना या जिल्हयांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा खरेदी-विक्रीचा सुळसुळाट होता. 


शंभरला पाचशेची नोट

झटपट श्रीमंत होण्यासाठी शंभर रुपयांना पाचशेची तर दोनशे रुपयांना हजारची बनावट नोट मिळते. पाचशेची नोट मुंबईत पोहोचेपर्यंत तिचा भाव दीडशे ते दोनशे रुपयांवर जातो. ही नोट खरी म्हणून चलनात आणल्यास साडेतीनशे रुपयांचा फायदा होतो. हे पाहून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आलेले बंगालमधील तरूण सर्रास बनावट नोटा चलनात आणतात.



हेही वाचा - 

व्हाॅट्स अॅपवर विवाहितेला अश्लील मेसेज

गुगलवर पत्ता शोधणं पडलं महागात; वृद्धाला ९८ हजारांना गंडवलं




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा