एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने हल्ला


एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने हल्ला
SHARES

एकतर्फी प्रेमातून अंधेरीच्या डीएन नगर परिसरातील स्टेशन ब्रिजवर अन्ना बीबी शेख नावाच्या महिलेची एका तरुणाने चाकूने वार करत हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी डीएन नगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


अनेक दिवसांपासून नजर

अंधेरीतील एका बारमध्ये अन्ना बीबी शेख उर्फ आएशा ही मागील अनेक दिवसांपासून काम करत होती. त्याच परिसरात राहणाऱ्या किस्मत शेखची तिच्यावर वाईट नजर होती. त्यामुळे किस्मत वेळोवेळी तिचा पाठलाग करायचा. अनेकदा त्याने आएशाजवळ आपल्या प्रेमाची कबुलीही दिली होती. मात्र आएशाने त्याला नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.रस्त्यात अडवलं

याचाच राग मनात धरून बुधवारी रात्री आएशा बारमधून घरी जाण्यासाठी निघाली असता किस्मतने तिचा पाठलाग करून तिला अंधेरी स्टेशन ब्रिजवर अडवलं. त्यावेळी त्याने पुन्हा आएशाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आएशाने त्याला नकार दिल्याने राग अनावर झालेल्या किस्मतने सोबत आणलेल्या चाकूने आएशावर असंख्य वार केले.


उपचारादरम्यान मृत्यू

रक्ताच्या थारोळ्यात भररस्त्यात पडलेल्या आएशाला वाचवण्यासाठी प्रवाशांनी कूपर रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान आएशाचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषीत केलं. या प्रकरणी डीएन नगर पोलिसांनी किस्मत विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. तर आएशावर कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचं सांगण्यत आलं आहे.हेही वाचा-

कुरियर बॉय बनून चौघांनी वृद्ध महिलेला लुटलं

'फटका गँग'ला जीआरपीचा 'दणका'Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा