मागवला मोबाईल मिळाला दगड!

अंधेरी - तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय का ? जर करत असाल तर हे दृश्य पाहा..मागवला मोबाईल आणि मिळाला दगड..होय हे घडलंय मुंबई सारख्या शहरात. कमलेश गिरी अंधेरीच्या विरादेसाईमध्ये राहाणारे हे गृहस्थ..यांना ही तुमच्या आमच्या सगळ्यांसारखी ऑनलाईन शॉपिंगची भारी हौस..मात्र ऑनलाईन शॉपिंगमुळे त्यांची फसवणूक झालीय.  अतिशय पद्धतशीरपणे बॉक्समध्ये गुंडाळून आलेल्या 13 हजारांच्या या दगडाने कमलेश गिरी चांगलेच हादरले..मात्र सुदैवाने त्यांनी डिलिव्हरी बॉय जयवंत बनेच्या समोरच बॉक्स उघडल्याने जयवंत बनेने त्यांच्या बाजूनं स्टेटमेंट दिलीय. कमलेश गिरी यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांचे डोळे तर उघडले मात्र ऑनलाईनच्या या जमान्यात कधी कोणाची कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते याचा काही नेम नाही.

 

Loading Comments