दारूच्या नशेत पसरवली बाॅम्बची अफवा, झाला गजाआड


दारूच्या नशेत पसरवली बाॅम्बची अफवा, झाला गजाआड
SHARES

चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या इसमाला 'जीआरपी'ने अटक केली आहे. अजय कुमार चौबे (३८) असं या इसमाचा नाव असून त्याने दारूच्या नशेत धमकी दिल्याची माहिती 'जीआरपी'ने दिली.


फोन येताच खळबळ

रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) १८२ हेल्पलाईनवर ११ ऑक्टोबरला रात्री आलेल्या एका अनोळखी फोनने एकच खळबळ उडाली होती. रात्री १०.३० वाजता या काॅलरने चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली. फोन येताच ही गाडी कल्याण स्थानकात तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफने गाडीची कसून तपासणी केली. तपासणी झाल्यावर तब्बल २ तासांनी गाडीला पुढे सोडण्यात आलं.


'असा' सापडला काॅलर

या कॉलचा तपास कल्याण जीआरपीसह लोकल क्राईम ब्रांच (एलसीबी) देखील करत होती. ज्या फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्या फोनचा मागोवा घेत 'एलसीबी'चे अधिकारी ठाण्यातील सुहास देशमुख (६६) यांच्या दुकानात पोहोचले. हा फोननंबर त्यांचा नोकर अजय चौबे (३८) वापरत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर 'एलसीबी'च्या अधिकाऱ्यांनी चौबेला पकडलं.


दारूच्या नशेत काॅल

११ ऑक्टोबरला चौबे खूप दारू प्यायला होता आणि दारूच्या नशेतच त्याने गाडीत बॉम्बच्या धमकीचा फोन केल्याचं पोलिसांनी सांगितलं. ज्या फोन नंबरवरून हा फोन करण्यात आला. तो नंबर अजय काम करत असलेल्या दुकानाचे मालक सुहास देशमुख यांच्या नावावर होता.

सध्या या दोघांनाही कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिल्याची माहिती, मध्य रेल्वे 'जीआरपी'चे डीसीपी समाधान पवार यांनी दिली.



हेही वाचा -

ओला चालकाची पुन्हा मनमानी, तक्रार करून देखील ओलाने मात्र चालकाला घातलं पाठीशी

एक्स्प्रेसमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा