एक्स्प्रेसमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, सावंतवाडी दिवा पॅसेंजर अशा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चोरी करणारा सराईत चोर गजाआड

एक्स्प्रेसमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
SHARES

जीआरपीने एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक केली आहे. उमेश कांबळे (२५) असं या चोराचं नाव असून त्याच्याकडून ३ लाखांचे सोन्याचे दागिने जीआरपीने जप्त केले आहेत.

मागील काही महिन्यांपासून मध्य रेल्वेत सोनसाखळी, मंगळसूत्र चोरण्याचं प्रमाण वाढलं असून चोरांकडून प्रामुख्याने एक्स्प्रेस गाड्यांना लक्ष करण्यात येत आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, सावंतवाडी दिवा पॅसेंजर, पनवेल लोकल अशा गाड्यांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात येत होत्या. 

जुलै महिन्यात पनवेल स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दोन मंगळसूत्रं चोरण्यात आली. या घटनेच्या तपासात रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक इसम संशयीतरीत्या फलाटावर फिरताना दिसला होता.



या आरोपीचा जीआरपी शोध घेत असताना हा आरोपी पनवेल स्थानकावर नेत्रावती एक्स्प्रेस गाडीत चोरी करणार असल्याची खबर जीआरपीला मिळाली. त्यानंतर पनवेल स्थानकात सापळा रचून उमेश कांबळेला अटक करण्यात आली. उमेशच्या चौकशीत त्याने चोरी केलेली सोन्याची मंगळसूत्रे कोल्हापूर येथील सोने व्यापाऱ्यांना विकल्याचं समोर आलं.

या आरोपीकडून आम्ही ५ गुन्ह्यांचा उलगडा केला असून २ लाख ९६ हजार रूपये किमतीचे दागिने जप्त केल्याची, माहिती पश्चिम रेल्वे जीआरपीचे डीसीपी समाधान पवार यांनी दिली.



हेही वाचा

धक्कादायक! नवऱ्याने केला अनैसर्गिक सेक्स, सासू, नणंदेनं केलं चित्रीकरण

फोर्टमध्ये सापडला फाटक्या नोटांचा खच!

गँगस्टर डी. के. रावला खंडणीप्रकरणी अटक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा