गँगस्टर डी. के. रावला खंडणीप्रकरणी अटक


गँगस्टर डी. के. रावला खंडणीप्रकरणी अटक
SHARES

गँगस्टर डी. के. रावला मुंबई गुन्हे शाखेने अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अॅण्टाॅप हिल येथील एका एसआरए प्रोजेक्ट कन्सल्टंटकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी डी. के रावला अटक केल्याची, माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत यांनी दिली आहे.


४ वर्षांपासून धमक्या सुरूच

अॅण्टाॅप हिल परिसरात १ हजार कोटी रुपये मूल्य असलेला एक 'एसआरए प्रोजेक्ट' बऱ्याच वर्षांपासून रखडला होता. त्यानंतर एका कन्सल्टंटच्या मध्यस्तीनंतर प्रोजेक्टचं काम पुन्हा सुरू झालं. हे काम सुरू होताच या कन्सल्टंटला गँगस्टर डी. के. राव याच्या नावानं २०१३ पासून धमक्या येऊ लागल्या. मात्र या काळात राव तुरूंगात असल्यानं कन्सल्टंटने त्याकडं फार लक्ष दिल नाही.


तुरूंगातून बाहेर येताच धमक्या वाढल्या

परंतु, जुलै २०१६ मध्ये डी. के. राव तुरूंगातून जामिनावर बाहेर येताच धमक्याचं सत्र वाढलं. कहर म्हणजे जून २०१७ मध्ये धारावीतील एका निर्जन स्थळी बोलवून डी. के. रावने कन्सल्टंटला समोरासमोर धमकावत ५० लाखांची खंडणी मागितली. झालेल्या प्रकारानं घाबरलेल्या कन्सलटन्टनं थेट धारावी पोलीस ठाण्यात तक्रार केली.


तुरूंगातूनही देत होता धमक्या

या प्रकरणात गँगस्टर डी. के. रावचा सहभाग निष्पन्न होताच त्याला गुन्हे शाखेने अटक केली. १८ ऑक्टोबरपर्यंत तो आमच्या ताब्यात असल्याची माहिती यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत यांनी दिली.

डी. के. राववर तब्बल ४७ गुन्ह्याची नोंद असून त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे तुरूंगात असताना देखील डी. के. रावने खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्याने तो तुरूंगातूनही गुन्हेगारी कारवाया करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


हेही वाचा

अखेर छोटा शकील, इक्बाल कासकरला 'मोक्का'

खंडणीखोर तोतया पोलीस गजाआड

एकतर्फी प्रेमातून चिमुरड्यांचं अपहरण, पोलिसांनी केली सुखरूप सुटका



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा